बहुजननामा ऑनलाइन टीम – हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, अॅक्ट्रेस रिहाना (Rihanna) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तिनं शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यानं तिच्यावर काहींनी टीकाही केली आहे. रिहाना नंतर आता एक्स अॅडल्ट स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) हिनंही शेतकरी आंदोलनाला सपोर्ट केला आहे. तिनं ट्विटर आणि इंस्टावरून यासंदर्भात काही पोस्ट शेअर केल्या आहेत.
मियानं तिच्या इंस्टा स्टोरीला शेतकरी आंदोलनाचा फोटो शेअर केला आहे. यात तिनं लिहिलं की, आंदोलनादरम्यान दिल्लीत इंटरनेट बंद करण्यात आलं. हे काय चाललंय.
रिहाना के बाद अब किसानों के समर्थन में उतरीं मिया खलीफा, इंटरनेट बैन पर उठाए सवाल pic.twitter.com/dG2lc1mKBj
— TimePass (@TimePassTalks) February 3, 2021
तिनं ट्विटरवरूनही आंदोलनाचा फोटो शेअर केला आहे. तिनं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दोन ट्विट केले आहेत. एकात तिनं लिहिलं की, कोणत्या मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये तिनं लिहिलं की, मला आशा आहे अवॉर्ड सीजनमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. मी शेतकऱ्यांसोबत उभी आहे.
What in the human rights violations is going on?! They cut the internet around New Delhi?! #FarmersProtest pic.twitter.com/a5ml1P2ikU
— Mia K. (@miakhalifa) February 3, 2021
“Paid actors,” huh? Quite the casting director, I hope they’re not overlooked during awards season. I stand with the farmers. #FarmersProtest pic.twitter.com/moONj03tN0
— Mia K. (@miakhalifa) February 3, 2021
काय म्हणाली होती रिहाना ?
रिहानानं ट्विटरवर एक न्यूज शेअर करत शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला. यात शेतकरी आंदोलनामुळं बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात हरियाणातील अनेक जिल्ह्यात यामुळं इंटरनेट सेवा कशा प्रकारे बंद करण्यात आली हेही सांगितलं आहे. या न्यूजसोबत तिंन कॅप्शनमध्ये लिहिलं की, आपण यासंदर्भात चर्चा का नाही करत आहोत.