भंडारा : बहुजननामा ऑनलाईन – Accident in Bhandara | राज्यात अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. भंडाऱ्यात भरधाव ट्रक आणि ट्रॅक्टरचा असाच एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये शेतातील माल घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने साइड न दिल्याने ट्रॅक्टर सरळ पुलावरुन 30 फुट खोल चुलबंद नदीत कोसळला आहे. हा अपघात भंडारा जिल्ह्यातील पवनी -लाखांदूर मार्गावरील शिव मंदीर जवळील पुलावर घड़ली आहे. (Accident in Bhandara)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय घडले नेमके?
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पवनी येथे ट्रकने ट्रॅक्टरला साईड न दिल्याने ट्रॅक्टर थेट नदीत कोसळला आहे. या अपघातात ट्रॅक्टरवरील 1 जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आण्णा पारधी (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर राष्ट्रपाल ठाकरे (वय 50) राध्येश्याम ढोरे (वय 44) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. (Accident in Bhandara)
लाखांदूर येथील शेतकरी राष्ट्रपाल ठाकरे यांनी आपल्या शेतातील कडधान्य बाजार समिती येथे नेण्याकरिता आपल्या ट्रॅक्टरमध्ये भरून सहकारी आण्णा पारधी व राध्येश्याम ढोरे यांच्या सोबत ट्रॅक्टरवर निघाले होते.
लाखांदूर-पवनी मार्गावरिल चुलबंद नदीवरील पुलावरुन समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या ट्रॅक्टरला साइड
दिली नाही. यामुळे ट्रॅक्टर चालकाने आपला बचाव करण्यासाठी साईडला घेताना ट्रॅक्टर सरळ 30 फुट पुलावरुन खाली
कोसळला. यात आण्णा पारधी यांच्या जागीच मृत्यु झाला असून राष्ट्रपाल ठाकरे यांचा पाय मोडला आहे.
राध्येश्याम ढोरे हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी
घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरु केला.
Web Title :- Accident in Bhandara | accident in bhandara truck overturned tractor on river bridge three drowned
हे देखील वाचा :
Pune Kasba Peth Bypoll Election | धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय होणार – मोहन जोशी
IND VS AUS Womens T20 World Cup | भारताला मोठा धक्का ! पूजा वस्त्राकर सेमी फायनलमधून बाहेर