सांगली : बहुजननामा ऑनलाइन – प्रधानमंत्री आवास योजनेतील (Pradhan Mantri Awas Yojana) घरकूल बांधकाम करण्यासाठी मंजूर निधीतील हप्ता जमा करुन देण्यासाठी 13 हजारांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) स्थापत्य अभियांत्रिकी सहायकास सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले. अजित मुबारक मुल्ला Ajit Mubarak Mulla (वय-47 रा. कवठेमहंकाळ) असे कर्मच्याऱ्याचे नाव आहे. ही कारवाई शहरातील म्हसोबा गेटजवळ मंगळवारी (दि.30) सापळा लावून करण्यात आली. अजित मुल्ला कवठेमहांकाळ पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे. या घरकुलाच्या बांधकामासाठी मंजूर निधीमधील तिसरा व चौथा हप्ता जमा करण्यासाठी मुल्ला याने तक्रारदार यांच्याकडे 20 रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी 26 मे रोजी तक्रारदाराने सांगली एसीबीकडे तक्रार केली होती.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, मुल्ला याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजारांची लाच मागून तडजोडी अंती 13 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी म्हसोबा गेटजवळ सापळा लावण्यात आला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून 13 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना मुल्ला याला रंगेहाथ पकडण्यात (ACB Trap News) आले. मुल्ला विरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात (Kavthemahankal Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी (Addl SP Vijay Chaudhary)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संदीप पाटील (DySP Sandeep Patil), पोलीस अंमलदार अजित पाटील, प्रितम चौगुले,
ऋषीकेश बडणीकर, पोपट पाटील, सुदर्शन पाटील, रविंद्र धुमाळ, चंद्रकांत जाधव, सिमा माने, उमेश जाधव, चालक वंटमुरे यांच्या पथकाने केली.
Web Title : ACB Trap News | An employee of Kavthe Mahankal Panchayat Samiti was caught in the net of
anti-corruption while accepting a bribe of 13 thousand rupees to pay the house installment
- Pune Maitri Box Premier League | मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन !
खासदार अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या – ‘विचारधारा कोणतीही असली तरी सर्वांचे ध्येय देशाला पुढे घेऊन जाणे हेच आहे’ - Maharashtra Politics News | ‘हवालदिल शेतकरी वाऱ्यावर… उपमुख्यमंत्री टाईमपास गप्पा मारायला शिवतीर्थावर!’, राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
MP Vinayak Raut | ‘पूर्ण ठाकरे गट असंतुष्ट’, फडणवीसांच्या टीकेला विनायक राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले –
‘फडणवीसांनी भाजपला लागलेल्या पनवतीची…’