लातूर : बहुजननामा ऑनलाईन – दाखल झालेल्या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेताना अहमदपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले.
उल्हास सखाराम चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी उल्हास चव्हाण याने ५ हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकऱणी तक्रारदाराने नांदेडच्या अँटी करप्शनकडे तक्रार केली होती. त्यानंतर पथकाने याची पडताळणी केली आणि सापळा रचला. तडजोडीअंती चव्हाण यांना १ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
पोलीस निरीक्षक भुजंग गोडबोले, कर्मचारी एकनाथ गंगतीर्थ, गणेश तालकोकुलवार, दर्शन यादव आणि इतरांच्या पथकाने ही कारवाई केली.