नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar | अनेकदा अशी स्थित येते जेव्हा आपल्या आधार कार्डवर एका शहराचा पत्ता असतो, आणि आपण दुसर्या शहरात राहण्यासाठी जातो. अशावेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. UIDAI घरबसल्या ऑनलाइन अॅड्रेस अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. (Aadhaar) यामध्यमातून तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून अड्रेस अपडेट करू शकता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जाणून घेवूयात संपूर्ण प्रक्रियेबाबत :
– UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा, येथे एक My Aadhaar चा एक टॅब दिसेल.
– माय आधारवर क्लिक करून दुसर्या ओळीत Update Your Aadhaar चा पर्याय दिसेल.
अपडेटच्या पर्यायात गेल्यानंतर तिसर्या ऑपशन your address online वर क्लिक करा.
– या ऑपशनवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल, जिथे खाली गेल्यानंतर तुम्हाला Proceed to Update Address वर क्लिक करावे लागेल, ज्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
त्या पेजवर आपला आधार नंबर टाकून कॅप्चा व्हेरिफिकेशन करून सेंड OTP वर क्लिक करावे लागेल, ज्यानंतर आधार रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपीचा मेसेज येईल.
हा ओटीपी एंटर केल्यानंतर Data Update Request च्या ऑपशनवर क्लिक करावे लागेल.
यानंतर अॅड्रेस ऑपशनवर क्लिक करून तुम्ही नवीन पत्ता अपडेट करू शकता.
– नवीन अॅड्रेस अपडेट करण्यासाठी सध्याच्या अड्रेसची पूर्ण माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्र म्हणजे अॅड्रेस प्रूफचा रंगीत स्कॅन फोटो अपलोड करावा लागेल.
हे अपडेट केल्यानंतर तुमचा सध्याचा अड्रेस अपडेट होईल.
Web Title : aadhaar news update your adhaar address online with the help of these simple steps
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Coronavirus | ‘कोरोना’चा उगम झाला ‘त्या’ वुहानमधील 1.10 कोटी रहिवाशांची चीन करणार पुन्हा Test
PM Shram Yogi Man Dhan pension | रोज 2 रुपये जमा करून मिळवा 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या डिटेल