बहुजननामा ऑनलाईन टीम : ऑस्कर विनर संगीतकार ए आर रहमान (A. R. Rahman) ची आई करीमा बेगम यांचं निधन झालं आहे. सिंगरनं आईचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे की, 28 डिसेंबर रोजी त्याच्या आईनं जगाचा निरोप घेतला. एआर रहमान आपल्या आईच्या खूप जवळ होता. त्यामुळं आईला गमावणं त्याच्यासाठी मोठा धक्क होता.
रहमाननं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे आणि रहमानच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.
— A.R.Rahman (@arrahman) December 28, 2020
अनेकांना माहित नसेल परंतु करीमा बेगम यांचं नाव कस्तुरी होतं. जे नंतर बदललं गेलं. सिगरनं देखील त्याचं दिलीप कुमार हे नाव बदलत एआर रहमान केलं होतं. काही दिवसांपू्र्वीच रहमाननं एका मुलाखतीत बोलताना आपल्य आईवर चर्चा केली होती. माझ्या आईनंच माझी संगीतामधील प्रतिभा ओळखली होती, मी नाही असंही त्यानं यावेळी बोलताना सांगितलं होतं.
आईनं वडिलांच्या म्युझिकल इंस्ट्रुमेंट्सच्या मदतीनं ‘असं’ चालवलं घर
रहमाननं सांगितलं की, जेव्हा मी 9 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हा माझ्या वडिलांचे म्युझिकल इंस्ट्रुमेंट उसणे ठेवत आई घर चालवायची. तिला हे विकून याच्या व्याजावर घर चालवण्याचा सल्लाही देण्यात आला होता. परंतु तिनं यासाठी नकार दिला होता. माझी आई म्हणायची की, माझा मुलगा आहे ती या सामानाची देखभाल करेल.