बहुजननामा ऑनलाईन टीम : एका 24 वर्षीय रशियन मुलीनं चक्क तिच्या ब्रिफकेससोबत लग्न केल्याची बातमी गेल्या आठवड्यापासून चर्चेत आहे. रेन गाॉर्डन असं तिचं नाव आहे. खास बात अशी की, रेननं त्या ब्रिफकेसचं नावही ठेवलं आहे. गाइडऑन असं तिनं याचं नाव ठेवलं आहे. सर्वांनी तिला याच नावावं बोलावं असंही तिचा आग्रह असतो. रेननं असं जाहीर देखील केलं होतं की, ती या ब्रिफकेसच्या प्रेमात आहे आणि तिच्यासोबत लग्न करणार आहे. जूनमध्ये रित्सर विधी होऊन रेनचं ब्रिफकेससोबत लग्न झालं.
वस्तूंसोबत लग्न का करतात लोक ?
अनेकांना प्रकार काहीसा विचित्र वाटत असेल परंतु ही एक गंभीर समस्या आहे. हा एक प्रकारचा आजार आहे. विशेष म्हणजे या आजाराचं प्रमाणही जगभर वाढत आहे. याला ऑब्जेक्टफिलिया असं म्हणतात. यात माणसांना वस्तू जास्त आवडतात. त्या वस्तू जर जवळ नसल्या तर ते वेडेपिसे होतात. इतकंच नाही तर त्यांनाच जन्माचा जोडीदार मानून त्यांच्याशी लग्नही करतात.
काय सांगतात तज्ज्ञ ?
तज्ज्ञांच्या मते, असं होण्याचं प्रमुख कारण म्हणजे माणसांपासून फटकून वागणं. काही माणसं अती एकटी असतात. कुणाशी बोलणं, माणसांसोबत राहणं त्यांना अवघड जातं. ते लाजाळूही असतात आणि एकटेही असतात. ते स्वत:चच खरं करतात. माणसांऐवजी ते वस्तूं सोबत बोलतात. एकटेपणाचं लहानपण, सतत अवती भोवती भांडणं, कुणीच बोलायला नसणं, यातूनही अनेकांना एखाद्या निर्जीव वस्तूशी बोलणं जास्त सोयीस्कर वाटतं.
वस्तूंशी लग्न करणारी रेन पहिलीच व्यक्ती नाही
अशा प्रकारे वस्तूंसोबत लग्न करणारी रेन ही पहिलीच व्यक्ती नाही. यापूर्वीही काही व्यक्तींनी अशा प्रकराचे लग्न केले आहेत. रेनला वयाच्या 8 व्या वर्षापासून वस्तूच जास्त आवडतात. ती तरुणपणी एका पुरुषाच्या प्रेमातही पडली. परंतु हे नातं जास्त काळ टिकलं देखील नाही.
रेनचं म्हणणं काय ?
रेन सांगते की, शहरातील मॉलच्या इमारतीच्याही ती प्रेमात होती. परंतु लोक हसतील म्हणून ती कधी काही बोलली नाही. रेननं 5 वर्षांपू्र्वी ही ब्रिफकेस विकत घेतली होती. आता तिच्यात रेनचा एवढा जीव गुंतला आहे तिनं थेट तिच्यासोबत लग्नच केलं आहे. खास बात अशी रेन या गोष्टीचं समर्थन देखील करते. तिचं म्हणणं आहे की, प्रेम प्रेम असतं. ते कशावरही करावं. ती अॅनिमिझम नावाची धार्मिक विचारधारा मानते. त्यानुसार प्रत्येक वस्तूत प्राणतत्व असतं असं काही लोक मानतात. यानुसार ट्रेन स्ट्रेशन सोबत लग्न करणं, लॅपटॉपच्या प्रेमात असण आणि त्यांचीशी संवाद साधणं अशाही घटना घडतात.