नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – मंबईकडून नाशिककडे येणार्या शिवशाही बस दुभाजक तोडून विरुद्ध बाजूला मुंबईकडे जाणार्या लेनवर येऊन तिने कंटनेरला धडक दिली. या अपघातामुळे पाठीमागून येणार्या कारचालकाचे नियंत्रण सुटून ती कंटेनर व पुलाच्या कठड्याला धडकली. कारमधील सरकारी वकील अजय मिसर हे थोडक्यात बचावले. ही अपघात शहापूर पुलावर रात्री घडला. या अपघातात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. मिसर यांच्या सुरक्षारक्षक जखमी झाला आहे.
उच्च न्यायालयात होणार्या एका खटल्याच्या सुनावणीसाठी मिसर यांना शुक्रवारी हजर रहायचे होते. त्यामुळे नाशिकहून ते मुंबईला जात होते. शहापूर पुलावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणारी महामंडळाची शिवशाही बस दुभाजक तोडून विरुद्ध बाजुला येऊन कंटेनरला जाऊन धडकली. या दोन्ही गाड्यांचा अचानक झालेल्या अपघातामुळे पाठीमागून येणार्या मिसर यांच्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. कार कंटेनर व पुलाच्या कठड्यामध्ये जाऊन धडकली. सुदैवाने अजय मिसर व त्यांच्या गाडीतील सुरक्षारक्षक, चालक हे सुखरुप बचावले.