बहुजननामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड स्टार संजय दत्त (Sanjay Dutt) ची मुलगी त्रिशाला दत्त (Trishala Dutt) सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव्ह असते. त्रिशाला आपल्या फोटो आणि आणि व्हिडीओंमुळं अनेकदा चर्चेत आली आहे. अनेकदा तिनं तिच्या बोल्ड अवतार देखील दाखवला आहे. त्रिशाला तिच्या आजी आजोबांसोबत अमेरिकेत राहते. अलीकडेच तिनं वडिल संजय दत्तच्या ड्रग अॅडिक्शनवर भाष्य केलं आहे.
त्रिशाला एक सायकॉलॉजिस्ट आहे. एका इंस्टा चॅटदरम्यान एका युजरनं तिला विचारलं की, वडिलांच्या ड्रग अॅडिक्शनवर काय म्हणशील. यावर त्रिशालानं सविस्तर उत्तर दिलं आहे.
त्रिशालानं संजयच्या ड्रग अॅडिक्शनवर लिहिलेली नोट तिच्या इंस्टा स्टोरीलाही शेअर केली आहे. त्रिशालानं लिहिलं की, आधी हे लक्षात घ्या की, नशा हा हळूहळू पकडणारा आजार आहे जो नशा करणाऱ्यांना आपल्या नियंत्रणात घेतो. याचे अनेक घातक परिणाम होतात.
त्रिशाला पुढं लिहिते की, सुरुवातीला ड्रग्ज घेण्याचा निर्णय जास्त करून लोक स्वत:च घेतात. ते आपल्या मर्जीनं ड्रग्ज घेतात. वारंवार ड्रग्ज घेतल्यानं मेंदूत असे काही बदल होतात जे खूप घातक असतात. व्यसनी माणसाचं स्वत:वर नियंत्रण रहात नाही. वारंवार ड्रग्ज घेण्याची इच्छा त्याला व्यसनी करते.
त्रिशालानं लिहिलं की, जर माझ्या वडिलांच्या ड्रग्ज घेण्यावर बोलायचं झालं तर ते कायमच रिकव्हरीच्या स्थितीत राहतील. हा एक असा आजार आहे ज्याच्या सोबत ते रोज लढतात. आता ते ड्रग्ज घेत नाहीत. मला माझ्या वडिलांचा अभिमान वाटतो की, त्यांनी ही गोष्टी स्विकार केली होती की, ते ड्रग्जच्या अधीन आहेत. त्यांनी सुरुवात केली आणि मदत मागितली. यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही.