पुणे : बहुजननामा ऑनलाईन- वादग्रस्त पुस्तकाचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेड, पुणेच्या वतिने शिक्षण आयुक्त कार्यालयात… कांदे बटाटे फेकून निषेध… संतोष शिंदे राज्यात इ. ११ वी. संस्कृत विषयाच्या ‘संस्कृत सारिका’ नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ दाखवली आहे. ‘महाराजस्य’ या वंशावळीत राष्ट्रमाता जिजाऊ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची ‘पत्नी’ दाखवले आहे. हे संस्कृत विषयाचे अतिशय वादग्रस्त पुस्तक आहे. हि सतत बादनामी भोसले तथा छत्रपती घराण्याविषयी जाणिवपुर्वक का होते…? हे शोधण्याची वेळ आली आहे.
राज्यात ११ वी च्या संस्कृत विषयाच्या आभ्यासक्रमात… लातुरच्या निकिता पब्लिकेशन अंतर्गत ‘संस्कृत सारिका’ हे पुस्तक श्री. राजेंद्र शास्त्री (गायकवाड) यांनी लिहिलेले आहे. त्यांनी केलेले लिखाण अत्यंत खोटारडे व वादग्रस्त आणि इतिहासाचा विपर्यास करणारे आहे. हा जाणिवपुर्वक खोडसाळपणा आहे.
‘संस्कृत सारिका’ हे वादग्रस्त पुस्तक तात्काळ #रद्द करावे… व संबंधित पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी करणाऱ्या सर्वांवर #सामाजिक_तेढ निर्माण केल्या प्रकरणी… लेखक, प्रकाशक, वितरक व अभियानाचे प्रमुख यांच्यावर १५३(अ), १५३(ब) महापुरूषांच्या बदनामी प्रकरणी सामाजिक दोन समाजात सामाजिक तेढ निर्माण करण्याप्रकरणी त्यांच्यावर #राष्ट्रद्रोहाचा गुन्हा करावा… अशी संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड’ची मागणी आहे.
इ. ११ वी. च्या आभ्यासक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची ‘पत्नी’ दाखवले आहे. असा भयंकर बदनामी करणारा मजकूर माध्यमिक महाविद्यालयांच्या मुलांना अभ्यासासाठी पुस्तकात छापला व शिकवला जातो हे भयानक खोटेपणा आहे. हा राज्य सरकारचा भोंगळ कारभार आहे… हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राज्याचा शिक्षण विभाग ‘विनोदाच्या तावडीत’ सापडला आहे.
बदनामी करणारा मजकूर वादग्रस्त पुस्तकात छापून सरकार दरबारी राज्याचा शिक्षण विभाग, अभ्यास समिती मुर्दाडासारखे परवानगी देतात… हा निव्वळ करंटेपणा व इतिहासातील खोटारडेपणा आहे. सरकार नेहमी शिवद्रोह्यांनी पाठीशी घालत आलेली आहे. सर्व आभ्यास समिती बरखास्त कराव्यात. व मान्यता देणारी आभ्यास समिती, तसेच संबंधित पुस्तकात बदनामी करणाऱ्या सर्वांवर सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी… लेखक, प्रकाशक, वितरक यांच्यावर सतत बदनामी प्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा करावा… अशी मागणी शिक्षण आयुक्त, शिक्षण मंत्री व राज्य सरकार यांच्याकडे… संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतिने करण्यात येत आहे. हे वादग्रस्त पुस्तक तात्काळ रद्द करा… सतत बदनामी संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड हे खपवून घेणार नाही.