नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान अर्ध्या रात्री संरक्षण मंत्रालयाने एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये देशवासियांना म्हटले आहे की, तुम्ही निवांत झोपा, कारण लष्कर तुमच्या रक्षणासाठी सतर्क आहे. हे ट्विट जम्मू-काश्मीरच्या उधमपुर जनसंपर्क कार्यालयाकडून (पीआरओ) करण्यात आले आहे.
Sleep peacefully fellow citizens. They stand guard!
— PRO Udhampur, Ministry of Defence (@proudhampur) August 31, 2020
भारताने पूर्व लडाखच्या पँगोंग क्षेत्रात चीनी लष्कराची घुसखोरी उलथवून टाकली आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून सैनिक जखमी झाल्यासंबंधी कोणताही दुजोरा अद्याप देण्यात आलेला नाही. ही घटना शनिवार आणि रविवारच्या रात्रीची आहे. आता चीन आणि भारत पूर्व लडाखमध्ये वादग्रस्त सीमा मुद्दा सोडवण्यासाठी कुटनिती आणि लष्करी चर्चा सुरू आहे.
चीनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न
भारतीय लष्कराने वक्तव्यात म्हटले आहे की, 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट, 2020 च्या रात्री पीपल्स लिब्रेशन आर्मी (पीएलए) च्या सैनिकांनी पूर्व लडाखमध्ये मागील सहमतीचे उल्लंघन करत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
लष्कराने म्हटले की, भारतीय सैनिकांनी पँगोंग सरोवराजवळ पीएलएच्या हालचाली उधळवून लावल्या. सोबतच आपली स्थिती आणि चीनी कारस्थाने उध्वस्त करण्यासाठी सुद्धा उपाय केले.
तर, चीनने पँगोंग सरोवराच्या उत्तरेत आपल्या सध्याच्या स्थितीवरून मागे सरकण्यास नकार दिला आहे. सोबतच पँगॉन्ग सरोवराजवळ चीनने फिंगर -5 आणि 8 च्या दरम्यान आपली स्थिती मजबूत केली आहे. तर पीएलए मेच्या सुरूवातीपासूनच फिंगर -4 पासून फिंगर -8 पर्यंत कब्जा केलेल्या 8 किलोमीटरच्या क्षेत्रातून मागे हटण्यास नकार दिला आहे.