बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव गेल्या तीन-चार दिवसांपासून वाढत असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. आजच (शनिवार) केंद्र सरकारनं अनलॉक 4 ची नियमावली जाहीर केली असून त्यामध्ये 30 सप्टेंबर पर्यंत प्रतिबंधित क्षेत्रात म्हणजेच कंटेन्मेंट परिसरात लॉकडाऊन चालूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 1968 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात पुणे शहरातील 46 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 15 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 2232 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 1657 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे.
आज दिवसभरात पुणे शहरात 1968 करोनाबाधित आढळले!
शहरातील उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 15 हजार 423 इतकी झाली आहे.
गंभीर रुग्ण 834
व्हेंटिलेटरवर 506#coronavirus #Pune #COVID19 pic.twitter.com/Iw4K5ggwb9— Smart Pune (@SmartPune) August 29, 2020
सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ही 92839 वर पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 75184 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 15423 रूग्ण हे अॅक्टीव्ह आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी तब्बल 834 जणांची प्रकृती ही क्रिटिकल असून त्यापैकी 506 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पुणे शहरात नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या लक्षणीय असल्याने पुन्हा एकदा पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
आज 1657 रुग्ण बरे झाले. पुण्यात आतापर्यंत एकूण 75,184 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी सोडण्यात आले आहेत.
एकूण पॉझिटिव्ह 92,839
आज 46 मृत्यू
एकूण मृत्यू 2232#COVID19 #Pune pic.twitter.com/wiYpndsISj— Smart Pune (@SmartPune) August 29, 2020