हैदराबाद : सणासुदीच्या काळात लोकांचा खर्च वाढतो, त्यामुळे प्रत्येकी वर्षी नोकरदारांना बोनस दिला जातो . अश्या वेळेस जर चांगला बोनस मिळाला तर सणांची मजा काही औरच असते. यावेळी सिंगरेनी कोलियरीज कंपनी लिमिटेड (एससीसीएल) दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या कर्मचार्यांना १,०१ लाख रुपयांचा बोनस देणार आहे. ही कंपनी राज्य सरकार चालवते. गुरुवारी सरकारने याची घोषणा केली आहे. विधानसभेत ही घोषणा करीत मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, ‘एससीसीएलची वाढ मागील पाच वर्षांत चांगली झाली असून त्याचे श्रेय कर्मचार्यांना जाते. ते म्हणाले की इथले कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून राष्ट्राची संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. मुख्यमंत्री म्हणाले की त्यांचे काम सैन्यापेक्षा कमी नाही.’
राव म्हणाले की, एससीसीएल (सिंगारेनी कोलियरीज कंपनी लिमिटेड) गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ४०,००० रुपये जास्त बोनस देण्यात आला आहे. कंपनीच्या नफ्यातून हे दिले जाईल. आता प्रत्येक कर्मचाऱ्याला १,००,८९९ रुपयांचा बोनस मिळेल. या कंपनीत ४८,००० लोक काम करीत आहेत ज्यांना दसऱ्यांच्या दिवशी हा बोनस मिळेल.
तेलंगणाच्या विकासासाठी एससीसीएलची खाण कंपनी मोठ्या प्रमाणात हातभार लावते. या मागे त्या कर्मचाऱ्यांचा हात आहे जो आपल्या जीवाला धोका पत्करतात आणि म्हणूनच कंपनी सतत विकसित होत आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, कर्मचार्यांच्या हितासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. २०१३-१४ मध्ये कर्मचार्यांना बोनस म्हणून १३, ५४० रुपये देण्यात आले होते. २०१७ – १८ मध्ये ६०, ३६९ रुपयांचा बोनस देण्यात आला. २०१३ मध्ये कंपनी ५०४. ७ लाख टन कोळशाचे उत्पादन करीत असे. दरवर्षी उत्पादन वाढ नोंदवत आहे. २०१८ – १९ मध्ये कंपनीने विक्रमी ६४४.१लाख टन कोळशाची निर्मिती केली आणि १,७६५ कोटी नफा कमावला आहे.
Visit : bahujannama.com