नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सलग तीन दिवस किमतीत वाढ झालेली आहे. शनिवार,१४ सप्टेंबर रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८ पैशांची वाढ करण्यात आली. त्याचबरोबर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ९ पैशांची वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीमध्ये – ७१. ९७ रुपये, , मुंबई- ७७. ६५ रुपये, कोलकाता ७४. ७० रुपये आणि चेन्नई येथे ७४.७८ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल मिळत आहे. त्याचबरोबर, डिझेलच्या किंमती ९ पैशांनी वाढ केल्यानंतर, आज दिल्ली आणि कोलकातामध्ये डिझेल ६५.३७ आणि ६७.७८ रुपये प्रति लिटर मिळत आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये डिझेल १० पैशांनी वाढवून ६८.५६ आणि लिटर ६९.९ रुपये झाले आहे.