बहुजननामा ऑनलाईन – कॉंग्रेसमधील अंतर्गत कहलामुळे बुधवारी (ता.२८) ब्रम्हपुरी येथे होणारी महापर्दाफाश सभा अखेर रद्द करण्यात आली. ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवारआणि नाना पटोले यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आल्याने ही सभा रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी खेळी करुन महापर्दाफाश सभा रद्द केल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र ही सभा रद्द होण्याला वडेट्टीवार यांनी केंद्रीय उमेदवार छाननी समितीच्या बैठकीचे कारण पुढे केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील अडचणी वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
विधानसभा निवडणूका दोन महिन्यावर आल्या असाताना सर्व पक्षात जोरदार तयारी सुरु आहे. पण वडेट्टीवार पक्षाच्या निर्णयावर नाराज असून त्याना महत्वाच्या समितीत डावलल जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस च्या अंतर्गत संघर्षात सुधारणा झालेली दिसत नाही. अशा चर्चा रंगल्या आहेत.कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्याच्या विधानसभा निवडणूकांसाठी एक समिती जाहीर केली होती.
त्यात कॉंग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे हे समितीच्या अध्यक्षपदी होते. तर हरिश चौधरी, मनिकम टागोर हे सदस्य तर ज्येष्ठ नेते मलिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नेते के. सी. पडवी यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत डावलल्यामुळे वडेट्टीवार यांनी काही दिवसांपुर्वी त्यांनी त्याच्या मनातील खंत व्यक्त केली होती. ते म्हणाले की, “राज्याच्या विधानसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेसने आपली निवड समिती जाहीर केली होती. पण समितीत मला डावलण्यात आले. यापुर्वी निवड समितीत विरोधीपक्ष नेत्याचे नाव असायचे, पण यावेळी माझे नाव त्या समितीत नाही. हे राजकारण आहे. राज्यातील मतदारसंघाची मला माहिती आहे. त्यानंतर त्यांचा या समितीत समावेश करण्यात आला होता.