पुणे : – Gultekdi Pune Crime News | घराबाहेर थांबलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन (Rude Behavior) करुन तिचा विनयभंग केला (Molestation Case). याचा जाब विचारणाऱ्या मुलीच्या वडिलांना चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली (Death Threats) . तसेच मुलीबाबत अश्लील बोलून (Speaking Obscenely) तिला पळवून नेण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुलटेकडी परिसरात घडला आहे. हा प्रकार रविवारी (दि.9) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) चार जणांवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 15 वर्षाच्या पिडीत मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भुऱ्या उर्फ मुस्ताफा खान (वय-30), रजाक सय्यद (वय-20), इरफान बागी (वय-25), फारुक अन्सारी (वय-25 सर्व रा. इंदिरानगर, गुलटेकडी) यांच्यावर आयपीसी 354(अ), 506, 323, 34 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पिडीत मुलगी तिच्या घरासमोर उभी असताना आरोपी भुऱ्या उर्फ मुस्तफा खान त्याठिकाणी आला. त्याने अचानक मुलीचा हात पकडला तर रजाक याने मुलीला पळवून नेऊ असे म्हणून तिच्यासोबत असभ्य वर्तन करत तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी पिडीत मुलीने आरोपीचा हात झटकडून घरात पळून गेली. तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार वडिलांना सांगितला.
पिडीत मुलीचे वडील याचा जाब विचारण्यासाठी इंदिरानगर येथील दिग्वीजय मित्र मंडळ येथे गेले. त्यांनी मुलीचा हात का पकडला अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपी भुऱ्या याने त्याच्याजवळील चाकू काढून जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच तुमची मुलगी खुप सुंदर आहे, तिला आत्तापण आम्ही पळवून घेऊन जाऊ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.