पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | एका १९ वर्षाच्या तरुणाने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यातून ती गर्भवती (Pregnant) राहिली आहे. आता २६ आठवड्याची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी या मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर ऊर्फ गालीब महिबुब आतार (वय १९, रा. काळेपडळ, हडपसर – Hadapsar News) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात रहायला आहेत.
आरोपीने फिर्यादीच्या १३ वर्षाच्या मुलीबरोबर मैत्रीचे संबंध निर्माण केले.
तिला खेळण्याचे बहाण्याने त्याच्या घरी घेऊन जात होता. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपण लग्न करु असे म्हणून तिच्याबरोबर तो लैगिंक चाळे करीत असत. जानेवारी ते जून २०२२ या दरम्यान त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले (Pune Minor Girl Rape Case). त्यातून ही गर्भवती राहिली. झालेला प्रकार घरच्यांना सांगितल्यास तिची बदनामी करण्याची व तिला ठार मारण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. आता ती २८ आठवड्याची गर्भवती झाल्याने हा प्रकार समोर आल्यावर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक लांभाते तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Khadak police arrested those who attacked the youth within 24 hours
हे देखील वाचा :
Pune Crime News | तरूणावर खुनी हल्ला करणार्यांना खडक पोलिसांकडून 24 तासाच्या आत अटक
MP Sanjay Raut | ‘यापुढे आम्ही आमच्या भूमीका ठरवू’, संजय राऊतांचा मित्रपक्षांना सूचक इशारा