पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Navale Bridge Accident | बंगलुरु -मुंबई महामार्गावरील नवले पुल परिसरातील अपघातांची मालिका सुरच असून बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून तो महामार्गावर उलटला. त्यात ७ जण जखमी झाले. हा अपघात नवले पुलाजवळ असणार्या भूमकर पुलाजवळ घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोल्हापूरहून टेम्पोचालक लक्ष्मण कोकरे हे कांदे बटाटे आणण्यासाठी मुंबईला जात होते.
त्याला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने त्याचे नियंत्रण सुटले व तो रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यात ७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस व हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने टेम्पो बाजूला घेऊन काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला.
Web Title :- Pune Navale Bridge Accident | Another accident near Navale Bridge; Pickup vehicle overturns, 7 injured
हे देखील वाचा :
Pune Crime | हॉटेलमध्येच पतीने केला पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, मुंढवा परिसरातील घटना
Pune ACB Trap | 2 लाखांच्या लाच प्रकरणी पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील क्षीरसागरसह दोघांना अटक, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Sushma Andhare | अरेच्च्या विसरलेच! सध्या तुमच्या मताला…, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना खोचक टोला