पुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन – पतीचे एका महिलेसोबत प्रेमसंबध (love affair) असल्याची माहिती पत्नीला मिळाली होती. त्यामुळे प्रेमसंबधाची विचारपूस केल्याने पतीने पत्नीचा गळा दाबून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर (Pune Crime News ) आली आहे. 13 ते 14 जून दरम्यान भवानी पेठेतील (Bhavani Peth) सपकाळ कॉम्पेक्समध्ये ही घटना घडली. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी खून करणा-या पतीला मंगळवारी (दि. 30) रात्री अटक केली आहे. Pune Crime News | husband strangles wife to death over love affair in bhavani peth pune
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
सुमैय्या सलीम शेख असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
सलीम शकील शेख (वय 33 रा. भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
त्याला न्यायालयात हजर केले असता 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
coronavirus Vaccine | कोरोना व्हॅक्सीनच्या अगोदर चुकूनही घेऊ नका पेन किलर्स, WHO ने केले सावध
समर्थ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीमचे सुमैय्यासोबत दुसरे लग्न झाले होते.
लग्नानंतर त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती सुमैय्यांना मिळाली होती.
त्याबाबत त्यांनी सलीमकडे विचारणा केली. त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते.
त्याचा राग आल्यामुळे सलीमने सुमैय्या यांचा 13 जूनला गळा आवळून खून केला.
त्यानंतर तो फ्लॅटला कुलूप लावून निघून गेला होता.
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.
मात्र तपासणीअंती सलीमने पत्नीचा खून केल्याचे उघडकीस आले.
सुमैय्या यांचा मोबाईल सापडलेला नाही. तो सलीमने नेला आहे का? या गुन्ह्यात त्याला कोणी मदत केली आहे का? खून केल्यानंतर तो फरार होता.
या कालावधीत तो कोठे राहत होता? याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.
त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी त्याला 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. समर्थ पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title : Pune Crime News | husband strangles wife to death over love affair in bhavani peth pune
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update