बहुजननामा ऑनलाइन टीम : केंद्रिय कर्मचाऱ्यांना प्रमोशननंतर पगारवाढ मिळण्याच्या तारखेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात होता. पगारवाढीसंदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. कर्मचाऱ्यांच्या मनात पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर सरकारने दिले आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला 2 जानेवारी ते 30 जूनच्या दरम्यान प्रमोशन मिळाले असेल, तर त्या कर्मचाऱ्याला 1 जानेवारीपासून पगारात वाढ करण्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. प्रमोशन मिळाल्यानंतर पगारवाढीसाठी कोणती तारीख ग्राह्य धरली जाणार, यावरून गोंधळाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने हा गोंधळ दूर केला असून, अर्थ मंत्रालयाचा खर्च विभागाने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एखाद्या बढती मिळाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पगारवाढही दिली जाते पण खर्च विभागाच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्याला ठरलेल्या तारखेच्या आधी किंवा नंतर मिळाले तर त्या कर्मचाऱ्याला सहा महिन्यांची सेवा पुर्ण झाल्यानंतरच पगारवाढ दिली जाणार आहे. मग त्या कर्मचाऱ्याला प्रमोशन 1 जानेवारीला मिळो किंवा १ जुलैला मिळो. कोणती तारीख आधी येते यावर अवलंबून असणार आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याला प्रमोशन देताना अथवा पगारवाढीसंदर्भात तारीख निवडण्यासंदर्भात दोन पर्याय दिले जातात. त्याच पर्यायाच्या आधारावर कर्मचाऱ्यांना लाभ दिले जातात.
असा बदल झाला
पूर्वी कर्मचाऱ्यांना 10, 20 आणि 30 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिले जाते. मात्र, आता त्या नियमात बदल करण्यात आला असून, कामाचे मूल्यमापन करुन प्रमोशन देण्याता निर्णय घेण्यात आला. आता सरकारनं पगारवाढीसंदर्भात संभ्रम दूर केला असला तरी पन्नास लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजूनही पुर्ण झाल्या नाहीत. सरकारने फिटमेंठ फॅक्टर वाढवून मूळ वेतन 26 हजार इतके ठेवावे, अशी मागणी केली जात आहे. सरकारने ही मागणी जर मान्य केली तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात 8 हजारांची वाढ होईल.
Visit : bahujannama.com