बहुजननामा ऑनलाईन टीम : धर्माच्या नावाखाली काही ढोंगी आध्यात्मिक गुरू बनून लोकांच्या श्रद्धेशी खेळत असतात . असेच एक प्रकरण सध्या उघडकीस आले आहे. स्वतः ला विष्णूचा दहावा अवतार अर्थात ‘कल्की’ म्हणून घोषित करणाऱ्या विजय कुमार नायडू याच्या सगळ्याच आश्रमांवर आयकर विभागाने कारवाई केल्यानंतर जवळपास ६०० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर या स्वयंभू भगवानने व्हिडिओवरून स्पष्टीकरण दिले आहे.
त्याने विडिओ शेअर करत म्हंटले कि, मी देश सोडून गेलेलो नाही, नाही आम्ही कुठे दुसरीकडे गेलो आहोत, आम्ही इथेच आहोत, आम्ही आमच्या भक्तांना सांगू इच्छितो कि, मी ठीक आहे. परंतु मीडियामध्ये अश्या बातम्या येत आहेत, कि मी देश सोडून पळून गेलो आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक तसेच बाहेरील अनेक देशांत या तथाकथित कल्की महाराजाचे जाळे पसरले आहे. आयकर विभागाच्या ३०० अधिकाऱ्यांनी मिळून कल्कीच्या ४० ठिकाणांवर छापा टाकला असून जवळपास भारतीय चलनातील ४४ कोटी रुपये , २५ लाख अमेरिकन डॉलर, २६ कोटी रुपयांचे ८८ किलो सोने तसेच ५ कोटी रुपयांचे १२७१ कॅरेटचे हिरे, ४०९ कोटी रुपयांच्या कमाईच्या पावत्या मिळाल्या आहेत.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार विजय कुमार नायडू हा ३० वर्षांपूर्वी एलआयसी क्लार्क होता, त्यानंतर १९८० साली साधूंचा वेष धारण करत आपला भोंदूगिरीचा व्यवसाय सुरु केला, ज्यातून लोकांना लुबाडण्यात येत होते. कल्कीच्या दर्शनासाठी ५ हजार रुपये तर विशेष दर्शनासाठी २५ हजार रुपये शुल्क वसूल केले जात होते. याचे जाळे अनेक राज्यांसोबतच परदेशातही पसरले आहे.
Visit : bahujannama.com