नाशिक : राज्यात गेल्या अकरा महिन्यांत रस्ते अपघात, विहिरीत पडून, तसेच शिकार आदी कारणांमुळे तब्बल १७३ बिबट्यांचा(173 leopards) मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यात ६३ बिबट्यांचा अधिक मृत्यू झाला असून नाशिक वनवृत्तामध्ये सर्वाधिक ७० बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
गतवर्षी राज्यात ११० बिबटे मृत्युमुखी पडले होते. यामध्ये नाशिक वनवृत्तातील ३९ बिबट्यांचा समावेश होता. हा आकडा राज्यात उच्चांकी होता. या वर्षीही नाशिक वनवृत्तामधील बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. गतवर्षीच्या तुलना करता नोव्हेंबरअखेरीस ३१ बिबटे अधिक मृत्युमुखी पडले आहेत. यंदा बिबट्यचे मृत्यू ही चिंतेची बाब मानली जात आहे.
नाशिकपाठोपाठ बिबट्याच्या मृत्युसंख्येत पुण्याचा क्रमांक लागतो. नाशिक वनवृत्तात सुमारे ७० बिबटे यंदा नोव्हेंबरपर्यंत मृत्युमुखी पडल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. तर पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २६ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत, तर कोल्हापूरमध्ये २६ आणि धुळ्यात १० बिबटे गतप्राण झाले