नागपूर बहुजननामा ऑनलाइन : आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या नागपुरातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आशिस उसरे असे या तरुणाचे नाव असून त्याने पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्याच्याकडे हे पिस्तूल कुठून आलं याचा तपास पोलीस करत आहेत.
आशीष हा नागपूरातील मानेवाडा रोड परिसरात राहतो. त्यामुळे परिसरात आत एकच खळबळ उडाली आहे. अजनी पोलीस स्टेशन हद्दीतल्या जयवंत नगर भागात हि घटना उघडकीस आली. कामठी परीसरात बिशीचे 12 लाख रुपये घेवून पसार झाल्याचा गुन्हा आशिष वर दाखल झाला होता, याच आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली.
तरी त्याच्याजवळ पिस्तूल आलं कुठून याचा पोलीस तपास करतायत, अशी माहिती अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक एच. एल. उरलागोंडावार यांनी दिली आहे.