बहुजननामा ऑनलाईन टीम : मेष : आजचा दिवस अनुकूल आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वाढीव खर्चातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे देखील आवश्यक आहे. विवाहितांसाठी उत्तम दिवस आहे, नात्यात रोमान्स वाढेल. प्रेमसंबंधामध्ये प्रिय व्यक्तीशी मनातील गोष्टी बोलू शकता, नाते आणखी चांगले करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण शांत असेल. कोणाकडूनही तक्रारी येणार नाहीत. कामात चांगले परिणाम मिळतील. कारण मेहनत कराल. विरोधकांपासून सावध रहा.
वृषभ
आजचा दिवस मध्यम आहे. आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याने मन आनंदित होईल. खर्च कायम राहील, खिशावरील ओझे वाढेल. वैवाहिक जीवनासाठी दिनमान कमजोर आहे. जोडीदाराशी कदाचित वाद होईल. प्रेमसंबंधात दिवस खूप आकर्षक असेल. प्रिय व्यक्तीबरोबर काही प्रेमळ क्षण घालविण्याची संधी मिळेल. कामात दिवस तुमच्या बाजूने असेल, चांगले परिणाम मिळतील. भाग्य प्रबळ राहील. यामुळे कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात शांतता राहील.
मिथुन
आजचा दिवस उत्तम आहे. लव्ह लाइफसाठी दिवस खूप चांगला आहे, रोमान्सची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवाल. त्यांना एखादी भेट देऊ शकता. कौटुंबिक वातावरण देखील चांगले राहील. कुटुंबाच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात हलका ताण येऊ शकतो. व्यवसायाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. कामात मेहनत करण्याचा दिवस आहे, तरच चांगले परिणाम मिळतील.
कर्क
आजचा दिवस अनेक मार्गांनी उत्तम ठरणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांमधून मुक्त व्हाल. आरोग्यामध्ये सुधारणा होईल. प्रवासात जाण्याचा योग येईल. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या तणावातून मुक्ती मिळेल. व्यापारात जबरदस्त चांगले परिणाम मिळतील. प्रेम जीवनासाठी दिनमान सामान्य आहे. नोकरी करत असाल तर आज संपर्णू डोकं कामात लावावे लागेल, तरच चांगले परिणाम मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास निश्चिंत राहाल. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस चांगला आहे, कारण उत्पन्न वाढेल.
सिंह
आजचा दिवस अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या सर्व गोष्टी ऐकून घ्याल, समजून घ्याल आणि त्यांना आपल्या जीवनात स्थान द्याल. यामुळे नाते मजबूत होईल. कामात प्रयत्न यशस्वी होतील. चांगले परिणाम मिळतील. नोकरीत बदली होऊ शकते. व्यापारात पूर्ण झोकून काम कराल, ज्यामुळे समाधानकारक परिणाम मिळतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. प्रेमसंबंधासाठी दिनमान थोडे कमजोर आहे. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. संततीबाबत काही चिंता असून शकतात. त्यांच्या भविष्याबद्दल विचार कराल.
कन्या
आजचा दिवस चांगला आहे. विरोधकांना मागे टाकाल. त्यांची कोणतीही चाल तुमच्यासमोर चालणार नाही. कामात चांगले परिणाम मिळतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक योजनाची अंमलबजावणी करण्यात यशस्वी व्हाल. सूख मिळविण्याची तीव्र इच्छा तीव्र होईल, म्हणून खूप खर्च कराल. दाम्पत्य जीवन सूखी राहील, अधून-मधून तणाव वाढू शकतो. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीची काळजी घेण्यास आनंद वाटेल, नातेसंबंध मजबूत होतील.
तुळ
आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. कामानिमित्त बाहेर कोठेतरी जावे लागेल, ज्यामुळे कुटुंबाची कामे रखडतील आणि यामुळे कुटुंबिय तुमच्यावर रागावू शकतात. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. नाते घट्ट राहील. जोडीदार काही खास करेल जे तुम्हाला खूप आवडेल. प्रेमसंबंधात नात्यात प्रेम राहील. मित्रांसमवेत वेळ घालवाल. जुन्या गोष्टी आठवून आनंदीत व्हाल.
वृश्चिक
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील समस्या सोडवण्यासाठी बहुतेक वेळ घालवाल. कामात खूप सावधगिरीने आणि काळजीपूर्वक काम करावे लागेल, तरच काही चांगले परिणाम मिळू शकतात. व्यापरासाठी दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस थोडा कमजोर आहे. कौटुंबिक तणाव जास्त गांभीर्याने घेऊ नका, अन्यथा आरोग्य बिघडू शकते.
धनु
आजचा दिवस चांगले परिणाम देईल. संपूर्ण लक्ष कामावर असेल, ज्यामुळे उत्कृष्ट परिणाम प्राप्त होतील. प्रेमसंबधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीला आनंदात ठेवाल. भेटवस्तूची देवाणघेवाण देखील होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंदी क्षण येतील. आरोग्य स्थिर राहील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. यामुळे मनाला समाधान मिळेल, इतर लोकांशी चांगला संपर्क ठेवाल.
मकर
आजचा दिवस उत्तम आहे. महत्त्वपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचाल. वैवाहिक जीवनात सुखद परिणाम साध्य होतील. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लांबच्या प्रवासाला जाण्याचा विचार कराल. सोबत जोडीदाराला घेऊन जाल. नात्यात गोडवा वाढेल. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होतील, ते नियंत्रणात ठेवाल. कामासाठी दिनमान यशदायक आहे.
कुंभ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आजारी पडू शकता, म्हणून काळजी घ्या. उत्पन्न कमी होऊ शकते. व्यापारात चांगले परिणाम मिळतील. काही माध्यमातून पैशांही आवकही चांगली होईल. पण तरीही मन समाधानी असणार नाही. कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनात जोडीदारासाठी खरेदी करायला जावे लागेल.
मीन
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ दिसेल. भाग्यावर अवलंबून न राहता मेहनत केल्यास चांगले परिणाम मिळतील. नोकरीत दिवस तुमच्या बाजूने असेल. वैवाहिक जीवनातही आनंद असेल. प्रेमसंबंधात आनंददायी परिणाम मिळतील. व्यापार पैसे देईल, ज्यामुळे आनंद होईल. कामात नावीन्य आल्याने संपूर्ण उत्साहाने काम कराल आणि चांगले परिणाम मिळतील.