बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यात कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडन निर्बंध लावले आहेत. त्यामुळे आता Zomato आणि Swiggy सारख्या फूड डिलीव्हरी करणाऱ्या अॅप ने रात्री 8 वाजेनंतर ऑर्डर घेणे बंद केले आहे. या दोन्ही अॅप कडून आपल्या ग्राहकांना नाईट कर्फ्यूच्या आदल्या दिवशी 5 एप्रिलला नोटिफिकेशन पाठवून माहिती देण्यात आली की त्यांनी आपली आर्डर रात्री 8 वाजण्याच्या आधी करुन घ्यावी. ज्यामुळे लवकरात लवकर तुमच्या पर्यंत तुमचे जेवण पोहचण्यास मदत होईल. या दोन्ही अॅप कडून आपल्या युजर्सला मेसेजच्या माध्यमातून माहीती देण्यात आली की रात्री 8 वाजल्यानंतर कोणतीही ऑर्डर स्विकारल्या जाणार नाही.
मुंबईमध्ये Zomato आणि Swiggy दोघांकडून अॅपच्या माध्यमातून संदेश देण्यात आला आहे. यामध्ये माहिती दिली गेली की, कंपनी रात्री 8 वाजल्यानंतर ऑर्डर घेणार नाही. रात्री 8 वाजल्यानंतर तुम्ही जर झोमॅटोवर फूड ऑर्डर केले तर तुम्हाला “We’re currently not accepting orders online. We’ll be back soon.” हा मेसेज दिसणार आहे. स्विगी वर मेसेज लिहीला असेल “We are not delivering here at the moment!”। या दोन्ही फूड डिलीव्हरी अॅप्सने हा निर्णय राज्य सरकार व्दारा प्रस्थापित केलेल्या निर्देशानुसार केला आहे.