नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेशनकार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी असून केंद्र सरकारने वितरण प्रणालीची नवीन व्यवस्था वन रेशन वन कार्ड योजनेत लाभार्थ्यांना एक सुविधा आणली आहे. ज्याच्या आधारावर जर लाभार्थ्यांच्या जवळ जुने रेशन कार्ड असेल तर नवीन रेशन कार्ड बनवायची गरज नसून देशात कोठेही गेला तरीही तुम्हाला जुन्या रेशन कार्डवर रेशन मिळेल. वन रेशन वन कार्ड योजना लागू झाल्यानंतर जुने रेशन कार्ड चालू राहील, असे केंद्र सरकराने स्पष्ट केले आहे. याअगोदर नवीन योजनेत नवीन कार्ड बनावेव लागेल, असे मानले जात होते. केंद्रीय खाद्य, ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.
दानवे यांनी सांगितले की, योजना लागू झाल्यावर कोणत्याही लाभार्थ्याला कोणतेही नवीन कार्ड दिले जाणार नाही. या योजनेतही ग्राहकांकडे जुने रेशन कार्ड असेल. काही लोकं सरळ आपला भ्रम पसरवत आहेत की, नवीन योजनेत नवीन रेशन कार्ड बनणार आहे. यासाठी काही लोकांकडून पैसेही घेतले जात आहेत. कोणत्याही जिल्ह्याचे रेशन कार्ड छापण्यासाठी त्यांच्याकडे काम देतील. अशा एका टोळीला पोलिसांनी पकडले आहे.
युपी, बिहारमध्ये १ जूनपासून योजना लागू
ते म्हणाले की, ग्राहकांच्या मते देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही १ जूनपासून ही योजना राबवणार असून जूनपासून तेथे सुरू होईल, अशी आशा आहे. यासह उत्तराखंड, ओडिशा आणि हिमाचल प्रदेशातही ही योजना सुरू करण्याची तयारी सुरू असून ही योजना जूनमध्ये देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये कदाचित लागू होईल. दिल्लीत यासाठी कोणतीही आवश्यक तयारी करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.