नवी दिल्ली : वृत्त संस्था – इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सोमवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे, ३२ वर्षीय तरूण ८१ वर्षीय वृद्ध बनून अमेरिकेत जाण्याच्या तयारीत होता. यावेळी त्याने सर्व मंजुरीदेखील घेतल्या होत्या, पण शेवटच्या क्षणी तो सीआयएसएफच्या हातात सापडला . नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , जयेश पटेल असे या तरुणाचे नाव असून तो अहमदाबादचा येथील रहिवासी आहे.
सीआयएसएफने सांगितले की, आरोपी पटेल हा अमेरिक सिंगच्या नावाने न्यूयॉर्कला जात होता. यावेळी त्याने स्वत: ला म्हातारा दाखवण्यासाठी चष्मा घातला आणि व्हीलचेयरवर विमानतळावर पोहोचला. जेव्हा सुरक्षा तपासणीच्या अंतिम फेरीसाठी सीआयएसएफने त्याला थांबवले तेव्हा त्यांनी व्हीलचेयरवरुन उठण्यास नकार दिला. जेव्हा त्याला विचारपूस केली गेली तेव्हा तो डोळ्यात डोळे घालून बोलत नव्हता. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांचा संशय अधिकच तीव्र झाला.
सीआयएसएफने दिलेल्या माहितीनुसार , त्याच्या पासपोर्टवर १ फेब्रुवारी १९३८ हि जन्मतारीख आहे. त्याने आपले केस आणि दाढी पांढरी केली होती. बारकाईने पाहिले असता, अधिका्यांना ८१ वर्षीय वृध्दासारखी त्याची कातडी दिसली नाही. या प्रकरणात, त्याच्यावर काटेकोरपणे चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने सत्याची कबुली दिली. दुसर्याच्या पासपोर्टवर तो अमेरिकेत जात असल्याचे त्याने सांगितले. यानंतर सीआयएसएफने त्याला दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले.
त्याच वेळी दिल्ली विमानतळावरून सेफी नूरजाई नावाच्या आणखी एका प्रवाशाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन पासपोर्ट जप्त केले. तो मलेशियाला जाण्याचा प्रयत्न करीत होता. संशयावरून तपास केला असता तो इतर पासपोर्टवरही बर्याच वेळा पाकिस्तानात गेल्याचे निष्पन्न झाले. दुसर्याच्या पासपोर्टवर मला मलेशियाला जायचे असल्याचे त्याने सांगितले.
- तोंडामध्ये दिसणारे ‘हे’ ५ संकेत सांगतात, तुम्हाला कँसर तर नाही ना
- झोपण्याच्या अर्धा तासापूर्वी प्या खजूरचे दूध, होतील ‘हे’ ५ जबरदस्त फायदे
- ‘पॉप कॉर्न’ खाल्ले तर कधीही होणार नाहीत ‘हे’ आजार, ‘हे’ आहेत ८ फायदे
- ‘बेकिंग पावडर’ने मारु शकता घरातील सर्व झुरळ, वाचा ४ सोप्या पद्धती
- सावधान ! जीवघेणे आहे वायुप्रदूषण, होऊ शकतात अनेक आजार, असा करा बचाव
- १५ दिवस अगोदरच मिळतात ‘हार्ट फेल्युअर’चे ६ संकेत, दुर्लक्ष करू नका
- हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमधील फरक माहित आहे का ?
- अशी आहे सकाळी उठण्याची योग्य पद्धत, होतात ‘हे’ ४ फायदे
- रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ ‘विलायची’, सकाळी पाहा याची ‘कमाल’
- झोपण्यापूर्वी प्या १ ग्लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे