बहुजननामा ऑनलाईन – तरुण-तरुणांने सोशल मीडियाच्या आहारी तुम्ही जर जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. या ना त्या मार्गाने ओळख वाढवून तुमचे आक्षेपार्ह छायाचित्रे एकत्रित केले जाउ शकतात. त्यामुळे अनोळखी मैत्री करताना विचार करणे आवश्यक आहे. त्यानंतर तक्रारदार पुढे न आल्याने आरोपीची हिंमत वाढल्याचे अटक केलेल्या अल्फाज जमानी या विकृतावरुन दिसून आले आहे. अल्पवयीन मुलींचे शोषण करणार्या 20 वर्षांच्या अल्फाजच्या जाळ्यात 700 मुली सापडल्याचा अंदाज आहे.
जमानीला सायबर पोलिसांनी गुजरातमध्ये अटक केली. वर्षभरापूर्वी त्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. मात्र मुलींच्या पालकांनी तक्रार देणे टाळल्याने अल्फाज सुटल्यानंतर त्याने असंख्य मुलींना लक्ष्य केले.
अल्फाजच्या मोबाइलमध्ये साठवून ठेवलेली तब्बल 700 अल्पवयीन मुलींची आक्षेपार्ह छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती पाहून सायबर पोलीसही चक्रावले आहेत. मुंबईतील तक्रारदार तरुणीव्यतिरिक्त अन्य 10 ते 10मुलींची ओळख पटली आहे. पालक पुढे आल्यास आरोपीविरोधात भक्कम पुरावे उभी करणे शक्य होईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सांगितले. पुणे पोलिसांच्या तपासात अल्फाजने शोषण केलेल्या 8 ते 10 मुलींची ओळख पटली होती. यातील बहुतांश मुली अल्पवयीन होत्या. मात्र 19 वर्षीय तरुणी सोडल्यास अन्य मुलींच्या पालकांनी तक्रार देणे टाळले होते. मुंबई सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी अल्फाजबाबत तपास करत आहेत. त्याने छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती मिळवण्याखेरीज अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत का, याची माहिती सायबर पोलीस घेत आहेत. दुसरीकडे त्याने हे अश्लिल साहित्य पॉर्न संकेतस्थळे चालविणार्या कंपन्यांना विकले आहे का? याचीही खातरजमा पोलीस करत आहेत. त्यासाठी त्याचे बँक खात्यातील व्यवहार तपासत आहेत.