पुणे : बहुजननामा ऑनलाईन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील कात्रज आंबेगाव खुर्दमधल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुला येथे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, उप महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आणि पोलीस उपअधीक्षक कुस्तीगीर राहुल आवारे यांचा सन्मान केला. तसेच त्यावेळी उपस्थित आयोजकांनीही अजित पवार यांचा सन्मान करत त्यांच्या हातात गदा दिली.
त्यावेळी पैलवानाला गदा दिली जाते, पण आज पहिल्यांदा कधीही कुस्तीचा लंगोट न घातलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिली. तलवार आम्हाला नेहमी दिली जाते पण तुम्ही दिलेली गदा मलाही कळली नाही कुठे ठेवावी, कशी धरावी, असे म्हणाल्यामुळे कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांमध्ये हशा पिकला.
आज, कात्रजच्या आंबेगाव खुर्दमधल्या आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुलात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, उप महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आणि पोलीस उपअधिक्षक कुस्तीगीर राहुल आवारे यांचा सन्मान केला आणि या गुणवान खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या! pic.twitter.com/ESyV46QP2v
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 26, 2020
तसेच गदा ही गदा ही पैलवानांच्या खांद्यावर शोभून दिसते. दुसऱ्या कोणाच्या खांद्यावर शोभून दिसत नाही. राज्यातील खेळ अधिक लोकप्रिय होण्यासाठी काय काय करता येईल यासाठी क्रिडामंत्र्यांसोबत बैठक घेतली. मुलगा अभ्यासात कमकुवत असला तरी खेळात उत्कृष्ट हवा असं पालकांना वाटलं पाहिजे. एखाद्या खेळात यश संपादन केल्यानंतर त्याला चांगली नोकरी लावता येईल यासाठी महाविकास आघाडीचे सरकार प्रयत्न करेल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.
आजपर्यंत पवार कुटुंब फक्त राजकीय मैदान गाजवतात असा माझा समज होता. पण पवार कुटुंब कुस्तीचं मैदानही गाजवतात हे आज कळलं. त्यामुळे पवार इथंही कमी नाही हे पुणेकरांनी लक्षात घ्यावं, असेही अजित पवार म्हणाले. पुण्यातील वाहतुकीबद्दल बोलताना ते म्हणाले की, पुण्यात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे. सत्कार समारंभामुळे गर्दी झाली. पण नागरिक बोलणार कोणाला ? पैलवानांचा कार्यक्रम आहे, असा चिमटाही अजित पवारांनी काढला.
Visit : bahujannama.com