नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Atal Pension Yojana : फक्त ७ रुपये रोज बचत करून तुम्ही तुमचा वृद्धापकाळ चांगला घालवू शकता. हे एका चहाच्या अथवा सिगारेटच्या किमतीपेक्षाही कमी आहे. तुम्ही अटल पेंशन योजनेच्या माध्यमातून असे करू शकता. एक कप चहाच्या किमतीतून तुम्ही दर महिन्याला ५००० रुपये मिळवू शकता, म्हणजेच वर्षाला ६०,००० रुपये. मोदी सरकारची ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे. परंतू आता यात १८-४० वर्षाची कोणतीही भारतीय व्यक्ती नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकते.
जितक्या लवकर गुंतवणूक तितका अधिक फायदा
अटल पेंशन योजनेचा अधिक लाभ घेण्यासाठी तुम्हाला या योजनेत लवकर सहभागी व्हावे लागेल. जर तुम्ही १८ व्या वर्षी या योजनेसोबत जोडले जाल तर तुम्हाला रोज ७ रुपये जमा करून प्रति महिना ५००० रुपये मासिक पेंशन मिळेल. त्यासाठी प्रति महिना २१० रुपये जमा करावे लागतील. वय वर्ष ६० नंतर तुम्हाला दर महिन्याला ५००० रुपये मासिक पेंशन मिळेल. एका महिन्याच्या १००० रुपयांच्या पेंशनसाठी प्रति महिना ४२ रुपये जमा करावे लागतील. तसेच २००० रुपये पेंशनसाठी ८४ रुपये, ३००० रुपयांसाठी १२६ रुपये आणि ४००० रुपये मासिक पेंशनसाठी दर महिना १६८ रुपये जमा करावे लागतील.
कोण लाभ घेऊ शकत ?
या योजनेचा लाभ १८ ते ४० वर्षाचा कोणीही भारतीय नागरिक गुंतवणूक करून पेंशनचा लाभ घेऊ शकतो. ज्यांच्याजवळ बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट आहे, अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत ६० वर्षानंतर जमाकर्त्यांना पेंशन मिळणे सुरु होईल. या योजनेत पेंशनची रक्कम तुमच्याद्वारे केल्या गेलेलया गुंतवणुकीवर आणि तुमच्या वयावर अवलंबून आहे.
जादा लाभ किती होईल ?
या योजनेद्वारे कमीत कमी १००० रुपये, २००० रुपये, ३००० रुपये, ४००० रुपये आणि जास्तीत जास्त ५००० रुपये मासिक पेंशन मिळू शकते. केंद्र सरकारने या योजनेची सुरवात मे २०१५ ला केली. या पेंशन योजनेसाठी तुम्ही नोंदणी करणार असाल तर तुमच्याजवळ बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे अवश्य आहे.