‘जन धन’ खात्याच्या ATM कार्डवर ऑफर्सचा ‘वर्षाव’, मिळवा 65% पर्यंत ‘सूट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर आपले जन धन खाते असेल तर आपल्याकडे ऑफर्सचा वर्षाव आहे. जन धन खात्यासह मिळालेले एटीएम कार्ड वापरुन तुम्ही मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. वास्तविक रुपे फेस्टिव्हल कार्निवल सुरू झाला आहे. त्यामध्ये उत्तम ऑफर आणि सवलत दिली जात आहे. एटीएम कार्ड देणारी कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने एटीएम कार्डधारकांना विशेष लाभ देण्याचे जाहीर केले आहे. या ऑफर काय आहेत आणि त्यांचा कसा फायदा होईल हे जाणून घेऊया.
जास्त डिस्काउंट असणाऱ्या ऑफर्सबाबत जाणून घ्या
एनपीसीआयने नमूद केले आहे की रुपे कार्ड धारण करणार्यांना आता अनेक श्रेणींमध्ये लाभ देण्यात येईल. यामध्ये या सणाच्या हंगामात आरोग्य, फिटनेस, शिक्षण आणि ई-कॉमर्सच्या आकर्षक ऑफरचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर डायनिंग आणि फूड डिलिव्हरी, खरेदी, करमणूक, वेलनेस आणि फार्मसी यासारख्या श्रेण्यांच्या ऑफर्सचा देखील लाभ घेतला जाऊ शकतो.
कॅशलेसला प्रोत्साहन देण्याचा हेतू
एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार, एटीएम कार्ड असलेले खातेदार कोणत्याही संपर्काशिवाय अत्यंत सुरक्षित असे कॅशलेस पेमेंट करू शकतात. यामुळे आजकाल उद्भवणारे संकटे देखील टाळता येऊ शकतात. एनपीसीआयच्या मते जन धन खातेदारांचा खरेदी अनुभव वाढविण्याचा हा आणखी एक मार्ग आहे. जन धन खातेधारक आता अॅमेझॉन, स्विगी, सॅमसंग, मिंत्रा, फ्लिपकार्ट, शॉपर्स स्टॉप, लाइफस्टाइल, बाटा, हेमलिस, जी5, टाटा स्काय, मॅकडोनाल्ड डोमिनो, डाइनआउट स्विगी, अपोलो फार्मसी, नेटमेड्स सारख्या ब्रॅंड्सवर या उत्सवाच्या हंगामात 10 टक्क्यांपासून ते 65 टक्क्यांपर्यंतच्या सवलतीचा फायदा घेऊ शकतात.
वस्तूंनुसार सूट मिळवा
ई-कॉमर्स शॉपिंगपासून ते शिक्षणापर्यंत ग्राहकांना रुपे फेस्टिव्ह कार्निवल अंतर्गत उत्तम ऑफर मिळत आहेत. यात मिंत्रावर 10% सूट, टेस्टबुक डॉटकॉमच्या टेस्ट पासवर 65 टक्क्यांची सूट, सॅमसंगच्या टीव्ही, एसी आणि स्मार्टफोनवर 52% पर्यंत सूट, बाटावर 25% सूट, पी अँड जी उत्पादनांवर 30 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकेल.
Comments are closed.