बहुजननामा ऑनलाईन टीम – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा दोन दिग्गज नेत्यांचा आज वाढदिवस आहे. सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहेत. अशात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आता देवेंद्र फडणवीसांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक छानसा ट्विट केला आहे. आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी लिहलं आहे की, “लोकमाणूस, सातत्यानं लोकांसाठी निस्वार्थीपणे सेवा देणाऱ्या, प्रत्येक दिवशी आतोनात मेहनत घेणाऱ्या, समाजाच्या कल्याणासाठी स्वत:ला वाहून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपणच माझी आणि अनेकांची प्रेरणा आहात. मानवसेवा करताना शांती शोधणाऱ्या सर्वांसाठी आपलं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे” असं त्यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1285853812188516352
देवेंद्र फडणवीस आज त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज त्यांना राज्यातील अनेक दिग्गज नेते, भाजप नेते, कार्यकर्ते अशा सर्वांनीच शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अशा दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्यात पत्नी अमृता यांनी फडणवीसांना दिलेल्या खास शुभेच्छा मात्र लक्ष वेधून घेत आहेत. सध्या अमृता यांचं हे ट्विट सोशलवर व्हायरल होत आहे.