गोरखपूर : बहुजननामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा-बसपा वर घणाघाती टीका करत सपा-बसपाचे कार्यकर्त्यांमध्ये निकालाच्या आधीच रक्तपात होईल असा दावा केला आहे. दोन्ही पक्षातील आघाडी निकालापूर्वीच तुटेल असाही दावा योगींनी केला आहे. सपा-बसपा कार्यकर्त्यंमध्ये होणाऱ्या हिंसाचारासाचा सामना करण्यासाठी आमचे सरकार तयारी करीत असल्याचे आदित्यनाथ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
अखिलेश आणि मायावतींनी गोरखपूरमधील झालेल्या सभेत योगींना मुख्यमंत्रीपदावरून दूर करून त्यांना मठामध्ये परत पाठवेपर्यंत शांत बसणार नाही असे सांगितले होते. यावर योगींना विचारले असता त्यांनी निकालापूर्वीच त्यांच्या आघाडीत स्फोट होऊन त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रक्तपात होईल. होणारा रक्तपात रोखण्यासाठी प्रशासनला सूचना दिल्या असल्याचे योगींनी सांगितले.
भाजपाचा पराभव करण्यासाठी उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाने आघाडी केली आहे. उत्तर प्रदेशात २०१४ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे भाजपासाठी सोपे राहिलेले नाही. यावळी मतविभाजन होणार नसून एकगठ्ठा मते आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधीक ८० जागा असल्याने सर्व देशाचे लक्ष उत्तर प्रदेशमधील निकालावर लागले आहे.