नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना व्हायरसवर उपाय शोधण्यासाठी जगभरातील तज्ज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरस विरोधात लस उपलब्ध झाल्यानंतर नवा स्ट्रेन आल्याने ही लस निष्क्रिय ठरेल का अशी भीत सर्वांच्या मनात आहे. याच दरम्यान आता एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर रुग्ण 3 दिवसांत बरा होतो असा देखील दावा केला आहे.
बाबा रामदेव यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध लाँच केले आहे. शुक्रवारी (दि.19) दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात याची घोषणा केली. यावेळी आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. बाबा रामदेव यांनी घोषणा केली की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर उपचार होतील. बाब रामदेव यांनी असा दावा केला आहे की, आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजूरी दिली आहे.
याआधीही बाबा रामदेव यांनी कोरोनाचे उपाय शोधल्याचा दावा केला होता. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते म्हणून बूस्टर अंस या औषधाला म्हटलं होतं. आता रामदेव बाबांनी कोरोनिलला CoPP – WHO GMP च्या प्रोटोकॉल आणि सर्टिफिकेशन सिस्टमनुसार सहाय्यक औषध घोषित केले आहे. पतंजलीकडून असा दावा केला जात आहे की 70 टक्के रुग्ण तीन दिवसांत बरे होतील.
यावेळी बाबा रामदेव यांनी म्हटले की, आज ऐतिहासिक दिवस आहे. एव्हिडन्स मेडिसीन्स म्हणून एव्हिडन्स आधारित संशोधन आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.
Delhi: Yog Guru Ramdev releases scientific research paper on 'the first evidence-based medicine for #COVID19 by Patanjali'.
Union Health Minister Dr Harsh Vardhan and Union Minister Nitin Gadkari are also present at the event. pic.twitter.com/8Uiy0p6d8d
— ANI (@ANI) February 19, 2021