नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बंदीला सामोरे जाणाऱ्या येस बँक सुधारताना दिसत आहे. खरं तर, गेल्या तीन व्यापार दिवसांमध्ये येस बँकेच्या शेअरमध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. येस बँकेच्या शेअरमध्ये ही वाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारतीय शेअर बाजार सगळ्यात वाईट टप्प्यातून जात आहेत.
आता काय आहे शेअरची परिस्थिती ?
आठवड्याच्या दुसऱ्या व्यापार दिवशी येस बँकेचे शेअर तब्बल ६० टक्क्यांनी वाढल्याची नोंद केली गेली आहे. येस बँकेचे शेअर ५८ रु.वर पोहोचले असून याअगोदर सोमवार आणि शुक्रवारीही येस बँकेच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली होती. बँकेच्या इतिहासात शेअरने अशी वाढ पाहिली नव्हती.
मूडीजही येस बँकेसाठी आनंदी !
कर्जात बुडालेल्या येस बँकेसाठी रेटिंग एजेन्सी मूडीजकडून चांगली बातमी आली आहे. खरंतर मूडीजन येस बँकेच्या आउटलूकला पॉजिटीव्ह करत आपली विश्वासार्हता सुधारली आहे. आरबीआयची पुनर्रचनेच्या योजनेअंतर्गत भांडवली उपस्थितीत वेगाने सुधारणा होत असताना रेटिंग एजन्सीने हे पाऊल उचलले आहे.एसबीआयच्या नेतृत्वात असलेल्या सात बँकांनी बँकेचे आधारभूत भांडवल मजबूत करण्यासाठी सुमारे १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. येस बँकेत गुंतवणूकीसाठी एसबीआयच्या नेतृत्वाखालील गटामध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लिमिटेड, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, बंधन बँक, फेडरल बँक आणि आयडीएफसी फर्स्टचा समावेश आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीही गरज भासल्यास येस बँकेला अतिरिक्त भांडवल देण्यात येईल, असे म्हटले आहे.
१८ मार्चपासून खातेधारकांना दिलासा
दरम्यान येस बँकेकडून आरबीआयची बंदी १८ मार्च रोजी बुधवारी संध्याकाळी ६ वाजता उठवली जाणार असून यानंतर येस बँकेचे खातेदार पूर्वीप्रमाणेच पैसे काढू शकतील. आर्थिक अनियमिततेमुळे येस बँकवर आरबीआयने बंदी घातली असून ती बंदी ३ एप्रिलपर्यंत होती. याअंतर्गत ग्राहक केवळ ५० हजार रुपये काढू शकतात. तथापि, बुधवारपासून खातेदारांना या बंदीपासून दिलासा मिळणार आहे.