Yerawada Pune Crime News | येरवडा जेलमधून सुटल्यानंतर रॅली काढणारा मोक्कातील गुंड प्रफुल कसबे झाला फरार (Video)

पुणे : Yerawada Pune Crime News | मोक्का कारवाई (Pune Police MCOCA Action) झाल्यानंतर तब्बल साडेतीन वर्षांनी येरवडा जेलमधून सुटल्यानंतर प्रफुल ऊर्फ गुड्या गणेश कसबे (Praful Alias Guddya Ganesh Kasbe) याने त्याच्या सुमारे ५० ते ६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली. त्याच्या समर्थकांनी नागरिकांना धमकाविले. या रॅलीची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला नोटीस बजावली. त्यानंतर तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav) यांनी सांगितले.
येरवडा येथील लक्ष्मीनगर येथील रहिवाशांच्या घरात शिरुन सराईत गुन्हेगारांनी घरांची तोडफोड करुन रस्त्यावर लावलेली वाहने फोडून दहशत माजविली. ही घटना जुलै २०२१ मध्ये घडली होती. येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, दहशत माजविणे, असे गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात गुंड्या कसबेसह १४ जणांना अटक केली होती. त्यात तडीपार केलेल्या तीन गुंडांचा समावेश होता. जुलैमध्ये घडलेल्या या प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी १४ जणांवर मोका कारवाई केली होती.
गेली साडेतीन वर्षे येरवडा तुरुंगात काढल्यानंतर नुकताच गुड्या कसबे याला जामीन मंजूर झाला होता. दोन दिवसांपूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर त्याने व त्याच्या सुमारे ५० ते ६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरातून कारमधून रॅली काढली. रात्रीच्या वेळी त्याच्या समर्थकांनी संपूर्ण परिसरात दहशत माजविली. नागरिकांना धमकाविले. या प्रकाराबाबत नागरिकांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीमध्ये तक्रार केली. परंतु, कोणतीही कारवाई केली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.
त्याच्या रॅलीला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, या रॅलीची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला नोटीस बजावली होती. त्यानंतर तो पसार झाला आहे़. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
गँगस्टर गजा मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या शेकडो समर्थकांनी मुंबई -पुणे महामार्गावरुन भव्य रॅली काढली होती. त्याची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. त्यानंतर या रॅलीवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी गजा मारणे याला सातारा जिल्ह्यातून अटक करुन त्याला स्थानबद्ध केले होते. त्यानंतर गुंडाच्या या रॅ बंद झाल्या होत्या.
त्यानंतर आता पुन्हा एकदा गुंडांचा उदोउदो सुरु झाला आहे. काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नाशिक येथील कुख्यात गुंडाने रॉयल मिरवणुक काढली होती. बॉस इज बॅक अशा घोषणाने शरणपूर परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर कोल्हापूरमध्येही जेलमधून सुटलेल्या मोकातील गुंडाची रॅली काढली गेली होती. त्यानंतर आता पुण्यातही गुंडाची रॅली काढून दहशत माजविली गेली.
Comments are closed.