नवी दिल्ली : व्रत्तसंस्था – कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कर्नाटकातील आधीच्या कुमारस्वामी सरकारला पाडण्यासाठी ‘ऑपरेशन कमल’ मध्ये आपली महत्त्वाची भूमिका होती हे त्यांनी स्वीकारले आहे . यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात जुलैमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले.
७ मिनिटांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये हुबळीत झालेल्या पार्टीच्या बैठकीबद्दल सांगितले जात आहे. दरम्यान ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये येडियुरप्पा दिसत नसले तरी त्यांचा आवाज येत आहे. दरम्यान येडियुरप्पा यांनी गेल्या महिन्यात २६ ऑक्टोबरला हुबळीतील हॉटेल डेनिस येथे पक्ष नेत्यांसमवेत अनेक बैठका घेतल्या. येथे त्यांनी ५ डिसेंबर रोजी १५ विधानसभेच्या पोटनिवडणुकांबाबत चर्चा केली. हा व्हिडिओ त्याच दिवसाचा सांगितला जात आहे,
या व्हिडिओत येडियुरप्पा म्हणाले की, ‘१७ आमदारांच्या निर्णयाबद्दल आपणा सर्वांना माहिती असेल. आपणा सर्वांना हे माहित असले पाहिजे की या सर्वांना मुंबईला पाठविण्याचा निर्णय फक्त माझा नव्हता तर पक्षाचा होता. अडीच महिने तो आपल्या भागात जाऊ शकला नाही किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही भेटू शकला नाही. ते सर्व मुंबईतच राहिले.
या व्हिडिओमुळे कर्नाटकातील भाजपने त्यांचे सरकार पाडले असा आरोप असलेल्या कॉंग्रेसच्या आरोपांना उधाण आले आहे. आता कॉंग्रेसने म्हटले आहे की हा व्हिडिओ पुरावा म्हणून घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाईल.