Yavatmal Crime News | लग्न ठरलं, साखरपुडाही पार पडला अन् काही कारणास्तव विवाह मोडला; अभियंता पदावर कार्यरत असलेल्या  उच्चशिक्षित तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime News | Pune: Businessman cheated through a drama of love! Threatened to defame by spreading obscene photos and videos; businessman took an extreme step

यवतमाळ : Yavatmal Crime News | अभियंता पदावर कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिक्षा केशव उमरे (वय-२७, मारेगाव, जि – यवतमाळ) असे जीवनयात्रा संपविलेल्या तरूणीचे नाव आहे. दिक्षाचा विवाह ठरला होता. मात्र, काही कारणास्तव हा विवाह मोडला. लग्न मोडल्याचा धक्का तिला सहन झाला नाही. याच तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Suicide Case)

अधिक माहितीनुसार, दिक्षाने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. सध्या ती छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी कंपनीत ‘वर्क फ्रॉम होम’ च्या माध्यमातून काम करत होती. काही दिवसांपूर्वी दिक्षाचे एका तरूणासोबत लग्न ठरले होते. लग्न ठरल्यानंतर त्यांचा साखरपुडाही पार पडला होता. मात्र, काही कारणास्तव त्यांचे लग्न मोडले.

गेल्या काही दिवसांपासून लग्न मोडले म्हणून दिक्षा नैराश्यात होती. याच तणावातून तिने घरातच गळफास घेत जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दिक्षाच्या पश्चात तिची आई, सेवानिवृत्त वडील आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.