बहुजननामा ऑनलाइन टीम – मालवण : नवसाला पावणारी अशी ख्याती पसरलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी (Yatra of Shri Devi Bharadi Mata)येथील श्री देवी भराडी मातेची यात्रा शनिवार ६ मार्च २०२१ रोजी होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वार्षिक यात्रा मर्यादित स्वरुपात आणि फक्त आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती आंगणे कुटुंबीय यांनी दिली.
भाविकांच्या होणार्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. भाविकांनी आपण ज्या ठिकाणी आहात, त्या ठिकाणाहून श्री देवी भराडी मातेस नमस्कार व आपले सांगणे सांगावे, आई भराडी माता आपल्या इच्छा पूर्ण करेल, असे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.