मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी आपल्या सर्वोत्तम प्रॉडक्ट साठी प्रसिद्ध आहे. मोबाईल, टीव्हीप्रमाणेच आता शाओमीने आपल्या भारतीय ग्राहकांसाठी एमआय क्रेडिट सर्व्हीस उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेसाठी शाओमीने इंस्टंट लोन देणारी कंपनी KrazyBee सोबत हातमिळवणी केली आहे. त्याअंतर्गत ग्राहकाला १ लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) देण्याचा निर्णय घेतला आहे. एमआय क्रेडिट सर्व्हीसच्या माध्यमातून ग्राहकांना अवघ्या ५ मिनिटांत तब्बल १ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार असून हे कर्ज महिन्याच्या हप्त्यांमध्ये फेडता येणार आहे.
आदित्य बिर्ला कॅपिटल पर्सनल फायनान्स, मनी व्ह्यू, अर्लीसॅलरी, क्रेडिटविद्या आणि झेस्टमनी ह्या कर्ज देणाऱ्या कंपन्या एमआय क्रेडिटसोबत भागीदारी करणार आहेत. शियाओमीनेही ही प्रक्रिया शंभर टक्के डिजिटल असून वापरकर्त्यांना अॅपवर विनामूल्य क्रेडिट स्कोअर देखील मिळणार आहे. तसेच कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ५ मिनिटांपेक्षा जास्त नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
Here's introducing #MiCredit a curated marketplace for lenders.
– 100% Digital
– Apply for loan in 5 minutes
– High success rate, higher loan amount, low interest rate
– Free Credit Score
– Encrypted data locally storedGet it on @googleplay and GetApps #MoneyWhenYouNeedIt pic.twitter.com/jc1oAqOn9k
— Mi Money – #MiPay x #MiCredit by #Xiaomi (@MoneyWithMi) December 3, 2019
असा करा अर्ज –
यासाठी वापरकर्त्यास गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन एमआय क्रेडिट अॅप डाउनलोड करावे लागेल. आवश्यक त्या परवानग्या दिल्यानंतर, ‘गेट नाउ’ बटणावर क्लिक करा. त्यानंतर आपला फोन नंबर प्रविष्ट करून लॉगिन करा. येथे वापरकर्त्याला स्वतःची सर्व माहिती भरावी लागेल. यानंतर वापरकर्त्याला पॅनकार्डचा फोटो तसेच नाव, लिंग आणि जन्मतारखेची माहिती अपलोड करावी लागेल. यानंतर वापरकर्त्याला अॅड्रेस प्रूफ आणि सेल्फी अपलोड करावी लागेल. कंपनीच्या पात्रतेनुसार दिल्या जाणाऱ्या कर्जाची माहिती स्क्रीनवर दिसेल. कंपनी वैयक्तिक कर्जावर दर महिन्याला १.३५ इंटरेस्ट इतका शुल्क आहे. हे कर्ज तुम्ही ९१ दिवसे ते ३ वर्षांच्या कालावधीत फेडू शकता.
दरम्यान, शियोमीने नवीन लोन प्रणाली लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फक्त फोनवरुन एक प्रोफाइल बनवावे मागेल, त्यानंतर लगेच लोन मिळून जाईल. मात्र, आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जात असल्याने डेटा सरंक्षणाचा प्रश्न उभा राहतो. मात्र, यावर ग्राहकांच्या डेटाची पूर्ण काळजी घेण्यात येणार असून हा डेटा एन्क्रिप्टेड स्वरुपात संग्रहित केला जाणार असल्याचे शाओमीने स्पष्ट केले आहे.