बहुजननामा ऑनलाईन टीम – उत्सवाच्या सीझनमध्ये कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर उत्तम ऑफर देत असतात . ऑनलाईन विक्री व आकर्षक ऑफर्सद्वारे कंपन्यांच्या उत्पादनावर विक्री नोंदविली जात आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता शियोमी(Xiaomi) ने ही ‘Diwali with Mi’ या सेलचे आयोजित केले असून त्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर आहे. शियोमीने सोमवारी सांगितले की, Mi.कॉम, फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या प्लॅटफॉर्मवर ‘Diwali with Mi’ या सेलच्या काही तासांतच 15 लाख उपकरणांची विक्री केली आहे.
गॅझेट 360 वर छापलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, शियोमी कंपनीने प्रत्येक सेकंदाला दहा उपकरणांची विक्री केली आहे. शियोमी इंडियाचे ऑनलाईन विक्रीचे प्रमुख रघु रेड्डी म्हणाले की, कंपनीने दसरा-दिवाळी सणाच्या आधीच एमआय टीव्ही, रेडमी 8 ए लॉन्च केले आणि रेडमी नोट 7 सिरीज, रेडमी 7 आणि रेडमी 7 ए वर आकर्षक ऑफरही दिल्या आहेत.
कंपनीने म्हटले आहे की कंपनीच्या उत्पादनांना सर्वाधिक मागणी असलेली वस्तू म्हणजे स्मार्टफोन त्यानंतर एमआय इकोसिस्टम, अॅक्सेसरीज आणि एमआय टीव्ही. याशिवाय शनिवारी (२ सप्टेंबर) रोजी विक्री सुरू झाल्याच्या अवघ्या 36 तासांतच 750 कोटी रुपयांचे स्मार्टफोन विकल्याचा दावा अॅमेझॉनने केला आहे. त्याचप्रमाणे फ्लिपकार्टने म्हटले आहे की, यावर्षी विक्रीच्या पहिल्या दिवशी गतवर्षीच्या तुलनेत दोन पट अधिक स्मार्टफोन विकले गेले आहेत. तथापि, दोन्ही कंपन्यांनी विक्रीची एकूण माहिती दिली नाही. असा अंदाज वर्तविला जात होता की या वेळी उत्पादनाची मागणी कमी होईल, परंतु या कंपन्या त्यांच्या सेलबद्दल सकारात्मक आहेत.
Visit : bahujannama.com