नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत चढ-उतार होत असून आता सौदीच्या राजाने आज अचानकच कच्च्या तेलाच्या किंमती कमी करून जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे शेअर बाजारालाही धक्का बसला आहे. गुंतवणूकदारांचे ५ लाख डॉलरचे नुकसान झाले आहे. पण तरीही मोठी आनंदाची बातमी असून कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोल भारतात ७६ रु. वरून ५० रु.वर घसरू शकते.
चीननंतर भारत हा पेट्रोल, डिजेलसह इतर पेट्रोलियम पदार्थांची आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. या किंमत कपातीचा फायदा देशाच्या तिजोरीलाही होणार असून असे झाल्यास त्याचा थेट फायदा वाहन चालकांनाही मिळू शकतो.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत ३० टक्क्यांनी घसरण झाली असून सौदी अरेबियाने किंमतीत कपात केल्यामुळे घटली आहे. सौदीने रशियाचा बदला घेतला असून सौदीने तेलाचे उतपादन घटवण्याची विनंती रशियाला केली होती. पण रशियाने थोडाही भाव न दिल्याने सौदी अरेबियाने तेलाचे भाव कमी केले आहेत. तसेच या दोघांमधील शीतयुद्ध काही काळ सुरू राहिले तर त्याचा थेट फायदा लोकांना होणार आहे.
तर भारताच्या क्रूड बास्केटची किंमत प्रति बॅरल ४७.९२ डॉलर असून भारताला एका बॅरलसाठी ३५३०.०९ रुपये खर्च करावे लागतात. जर ३० टकक्यांनी कपात झाली तर भारताचे जवळपास १००० रुपये वाचू शकतात. पुढील खरेदीवेळी बॅरल २४७० रुपयांना मिळणार आहे. सरकारने सर्वसामान्यांना लाभ द्यायचे ठरवले तर पेट्रोल पुढील काही दिवसांत ५० रुपयांत मिळू शकेल.