बहुजननामा ऑनलाइन टीम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मंदिरे भविकांच्या दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय जाहीर (Shri Bhairavnath Temple)केला. या निर्णयाचे स्वागतच करण्यासाठी बाणेर गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीने व सर्व राजकीय पक्षाच्या वतीने मनोभावे पूजा व आरती करण्यात आली.
या प्रसंगी ग्रामस्थ व सर्व पक्षाचे राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांमध्ये नगरसेवक बाबूराव चांदेरे, नगरसेविका सौ. ज्योती कळमकर, दिलीप भाऊ मुरकुटे, अशोक मुरकुटे, रोहिदास मुरकुटे, प्रल्हाद मुरकुटे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, विशाल विधाते, शेखर सायकर, बन्सी अण्णा मुरकुटे, प्रणव कळमकर,चंद्रशेखर चासकर, अप्पा भूमकर, बाळू लोखंडे, महादेव चाकणकर, बबनराव चाकणकर, सौ. सुषमा ताम्हाणे, कु. प्राजक्ता ताम्हाणे, पांडुरंग पारखे, लहू सायकर, गणेश भुजबळ, संजय ताम्हाणे, गणेश दिलीप मुरकुटे, अर्जुन शिंदे, मा. सरपंच जंगल रणवरे, अर्जुन ननावरे,जीवन चाकणकर, अनिकेत मुरकुटे , ह.भ. प. विक्रम काळे, भगवंत भुजबळ, अंकुश धनकुडे, मिलिंद पारखे, अक्षय कदम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व उपस्थितांना अप्पा भूमकर यांच्या निवासस्थानी चहापानाची व्यवस्था करण्यात आली.