बहुजननामा ऑनलाइन टीम –जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आता पुन्हा कोरोना लसीसंदर्भात नवीन निवेदन दिले आहे. वास्तविक त्यांचा असा विश्वास आहे की, पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत कोरोना लस तयार होणार नाही. डब्लूएचओचे प्रवक्ते मार्गारेट हॅरिस म्हणाले की, आतापर्यंत प्रगत क्लिनिकल चाचण्यांमध्ये जितक्या औषध कंपन्या लस तयार करत आहेत, त्यापैकी कोणतीही आतापर्यंत किमान ५० टक्के यशस्वी झालेली नाही.
तर दुसरीकडे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) या अमेरिकन संघटनेने सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना सांगितले आहे की, ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत दोन लस तयार करू शकतात. गेल्या आठवड्यात सीडीसीने सार्वजनिक आरोग्य संस्थांना पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये या लसीला ‘ए’ आणि ‘बी’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये लस संबंधित महत्वाची माहिती समाविष्ट आहे. जसे की लस शोधण्याच्या दरम्यान त्यांना कोणत्या तापमानात ठेवले पाहिजे. हे मापदंड मॉडर्ना आणि फायजर यांनी तयार केलेल्या लसींच्या मापदंडांसारखेच आहेत.
तसेच अमेरिकेत अॅस्ट्रॅजेनेका तयार करत असलेल्या कोरोना लसीची चाचणी तिसर्या टप्प्यात पोहोचली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत एकूण ८० ठिकाणी ३० हजार स्वयंसेवकांवर त्याची चाचपणी सुरू आहे. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, अॅस्ट्रॅजेनेका लस तिसर्या टप्प्यात पोहोचली आहे आणि लवकरच कोरोनाशी लढा देण्यासाठी वापरल्या जाणार्या लसींच्या यादीमध्ये सामील झाली आहे. याच महिन्यात ती बाजारात येण्याची अपेक्षा आहे.