वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील दोन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांचे निवडणूक कॅम्पेन जोरात सुरू आहे. या दरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे की, ट्विटरने ट्रम्प यांचे कॅम्पेनवाले ट्विटर अकाऊंट ब्लॉक केले आहे. ट्विटरने यापाठीमागे राष्ट्राध्यक्षांनी कोविड-19 बाबत चूकीची माहिती दिल्याचे कारण असल्याचे म्हटले आहे.
ऑनलाइन मीडियानुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आपला तो व्हिडिओ हटवावा लागेल, ज्यामध्ये त्यांनी म्हटलीे होते की, कोविड-19 साठी मुले जवळपास इम्यून आहेत. ट्विटरचे म्हणणे आहे की, जोपर्यंत हा व्हिडिओ हटवला जात नाही, ट्रम्प कॅम्पेनचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक राहील.
ही पहिली वेळ नाही, जेव्हा ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅम्पेन अकाऊंटबाबत मोठे पाऊल उचलले आहे. यापूर्वी ट्विटरने कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयडबाबत एक ट्विट केले होते, तेव्हासुद्धा ट्रम्प यांच्या ट्विटवर कडक भूमिका घेण्यात आली होती.
अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या सर्वेवर एक नजर टाकली तर, डोनाल्ड ट्रम्प यांना जो बिडेन यांच्याकडून जोरदार आव्हान दिले जात आहे. सीबीएस न्यूज बॅटलग्राऊंड ट्रॅकर सर्वेतून रविवारी समजले की, बिडेन नॉर्थ कॅरोलिनामध्ये ट्रम्प यांच्या 44 टक्के तुलनेत 48 टक्के आणि जॉर्जियामध्ये 45 टक्क्यांच्या तुलनेत 46 टक्क्यांनी पुढे आहेत.
1992 मध्ये बिल क्लिंटन यांच्यानंतर जॉर्जियामध्ये कुणीही डेमोक्रेट राष्ट्राध्यक्ष उमेदवार जिंकलेला नाही आणि एकमात्र डेमोक्रेट (बराक ओबामा 2008) ने मागील 10 राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत उत्तर कॅरोलिनामध्ये विजय नोंदला होता. विशेषकरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी महाविद्यालयीन श्वेतवर्णीय मतदार गमावले आहेत.