बहुजननामा ऑनलाईन
मानसिक आरोग्यबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोबरला ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ साजरा केला जातो. वर्ल्ड फेडरेशन फॉर मेन्टल हेल्थने 1992 मध्ये याची सुरूवात केली होती. या खास निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मानसोपचार तज्ज्ञ कशा प्रकारे व्यक्तीकडे पाहून मेंटल हेल्थचा शोध घेतात आणि याची
कोणती लक्षणे असतात.
सामान्य व्यक्ती – जर सामान्य सजगता आहे.
असामान्य व्यक्ती – जर आवश्यकतेपेक्षा जास्त सजग, आळस किंवा भ्रमीत आहे.
सामान्य व्यक्ती – जर चेहर्याचे हावभाव सामान्य आहेत.
असामान्य व्यक्ती – जर चेहर्याचे हावभाव अस्थिर असतील, खुप दुखी, चिंतेत बुडालेले, रागात, खुपच आनंदी किंवा कन्फ्यूज्ड दिसून येत असतील.
सामान्य व्यक्ती – जर आय कॉन्टॅक्ट सामान्य आहे, डॉक्टरांच्या नजरेला नजर देऊन बोलत असेल.
असामान्य व्यक्ती – जर नजर सतत वेगवेगळया ठिकाणांवर फिरत असेल किंवा नजर पूर्णपणे खाली जमीनीकडे आहे.
सामान्य व्यक्ती – जर आपले म्हणणे सामान्यपणे सांगू शकत आहे.
असामान्य व्यक्ती – जर डोळ्यात आश्रू आहेत, रडत आहे किंवा लाजरा भाव आहे, घाम येत आहे किंवा आवाजात कंप आहे.
सामान्य व्यक्ती – जर सामान्यपणे दरवाजातून येऊन खुर्चीवर बसून बोलत आहे.
असामान्य व्यक्ती – जर पाय डगमगत असतील, सांगून सुद्धा समजत नसेल, आत्मविश्वास कमी असेल.
सामान्य व्यक्ती – लोकांशी सामान्य वागत असेल.
असामान्य व्यक्ती – जर लोकांशी गरजेपेक्षा जास्त मैत्रीचा व्यवहार करत आहे, व्यंगात्मक बोलत असेल किंवा विनाकार अनोळखी व्यक्तीला भडकवत आहे.
सामान्य व्यक्ती – जर कोणत्या प्रश्नाला थेट उत्तर देत असेल.
असामान्य व्यक्ती – विचारल्यावर गप्प किंवा गरजेपेक्षा जास्त बोलणे किंवा यांत्रिक प्रकारे हो, नाही असे उत्तर देऊन गप्प बसत असेल.