बहुजननामा ऑनलाईन टीम : हृदयविकार असलेल्या किंवा हृदयाशी संबंधित आजार असलेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेण्याची गरज असते. अशा लोकांनी हेल्दी राहण्यासाठी काय करावं हे आपण जाणून घेणार आहोत.
1) नियमित व्यायाम करणं – याचा शरीराला खूप फायदा होतो. त्यामुळं दररोज न चुकता व्यायाम करणं शरीरासाठी उपयुक्त ठरतं. त्यामुळं रोज व्यायाम केला पाहिजे. व्यायामासोबत चालणं, एरोबिक्स किंवा योगासनं करणं हेदेखील केलं पाहिजे. मात्र कोणताही कठिण व्यायाम करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
2) आहाराकडे लक्ष द्या – जेवणात कायम सकस आहाराचा समावेश आहे. ताजी फळं, हिरव्या भाज्या, कडधान्य, डाळी यांचं सेवन आवर्जून करावं. बाहेरील पदार्थ, तेलकट, मसालेदार पदार्थ खाणं टाळावं.
3) वेळेवर औषध सेवन – वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घेणं, तसंच रक्तदाब, कोलेस्ट्रोल यांची पातळी योग्य आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर डॉक्टरांनी दिलेली औषधं न चुकता वेळेवर घ्या.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.