नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने खरेदी करण्याची पद्धत आता बदलली आहे. जगभरातील लोक सोन्याची नाणी, ज्वेलरी किंवा अन्य कोणत्या सोन्याच्या वस्तू खरेदी करण्याऐवजी आता यामध्ये गुंतवणूक करत आहेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या रिपोर्टनुसार, 2020मध्ये जानेवारीपासून जूनपर्यंत गुंतवणूकदारांनी 1,131 टन सोने जमा केले आहे. परंतु, हे फिजिकल फॉर्ममध्ये नाही, तर पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक केली आहे. रिपोर्टनुसार, मागील म्हणजे 2019मध्ये 595 टन सोने पेपर गोल्डद्वारे खरेदी करण्यात आले. तर या वर्षी 90 टक्के वाढून 1,131 टनावर पोहचले. डब्ल्यूजीसीने सांगितले की हा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तरावर आहे.
तीन महीन्यात खरेदी केले 582.9 टन सोने
डब्ल्यूजीसीनुसार, एप्रिल-जून तिमाही (एप्रिल-मे-जून) मध्ये गुंतवणूकदारांनी 582.9 टन सोने खरेदी केले आहे. हे मागच्या वर्षीच्या तुलनेत 98 टक्के जास्त आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये एप्रिल-जून तिमाही दरम्यान गुंतवणूकदरांनी केवळ 295 टन सोने खरेदी केले होते.
निम्मी झाली ज्वेलरीची मागणी
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या रिपोर्टनुसार, जगभरात सोन्याची मागणी एप्रिल-जूनच्या तिमाहीत 11 टक्के घटून 1,015.7 टनावर आली आहे. एप्रिल-जूनच्या कालावधीत सोन्याची एकुण मागणी घटून 1,015.7 टन राहिली आहे, जी मागच्या वर्षीच्या समान कालावधीत 1,136.9 टन होती. तिमाहीच्या दरमयान जागतिक स्तरावर दागिन्यांची मागणी 53 टक्के घटून 251.5 टन राहीली आहे, जी एक वर्षापूर्वी समान कालावधीत 529.6 टन होती. टेक्नोलॉजीमध्ये सोन्याची मागणी 18 टक्के घटून 80.7 टनावरून 66.6 टन झाली आहे. अशाच प्रकारे केंद्रीय बँकेच्या शुद्ध सोन्याची खरेदी 50 टक्के घटून 114.7 टन राहिली आहे, जी मागच्या वर्षीच्या समान कालावधीत 231.7 टन होती.
का घसरली मागणी
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोविड-19 महामारीमुळे अनेक देशांमध्ये लावण्यात आलेल्या प्रतिबंधामुळे सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. डब्ल्यूजीसीची सोन्याच्या मागणीच्या दिशेवर दुसर्या तिमाहीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोविड-19 मुळे सोन्याची ग्राहक मागणी घटली आहे.
हे लोक करत आहेत मजबूत खेरदी
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सोने आणि अशाच प्रकारच्या अन्य प्रॉडक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रेडेड फंड (ईटीएफ) ची मागणी 300 टक्क्यांच्या जोरदार वाढीसह 434.1 टनावर पोहचली आहे, जी मागील वर्षाच्या समान कालावधीत 76.1 टन होती.
आता पुढे काय होणार
डब्ल्यूजीसीचे एमडी, भारत सोमसुंदरम पीआर यांनी पीटीआयला सांगितले की, दुसर्या तिमाहीत सोन्याच्या मागणीतील घसरणीचे प्रमुख कारण लॉकडाऊन आहे. कारण कोरोना संक्रमण रोखण्यासाठी चीन आणि भारताने मोठ्या कालावधीसाठी आपले बाजार बंद ठेवले. याशिवाय जास्त किंमतीमुळे सोन्याची मागणी प्रभावित झाली आहे, हे स्थिती सामान्य झाल्यानंतरच समजू शकते. तेव्हा हे समोर येईल की, सोन्यातील तेजीबाबत ग्राहकांची काय प्रतिक्रिया आहे.