पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो त्यापार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षणासाठी विवाहात सत्कार म्हणून झाडे भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम रांजणगाव गणपती येथे संपन्न झालेल्या पाचंगे, माशेरे व शेळके विवाह सोहळ्यात कुटुंबीयांनी राबविला आहे.
पर्यावरण अनुकूलतेचा संदेश देत पत्रिका छापण्यावर अवास्तव खर्च न करता केवळ सोशल मीडिया व फोनद्वारे या विवाहाचे सर्वांना निमंत्रण देण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विवाह समारंभात नवदांपत्यासह उपस्थित मान्यवरांना प्रत्येकी एक याप्रमाणे झाडे भेट देण्यात आली. विवाहात हा अनोखा कार्यक्रम राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे वऱ्हाडी मंडळींनी कौतूक केले.
पुण्यातील रांजणगाव गणपती ढोकसांगवी ) येथील सामाजिक कार्यकर्ते गबाजी पाचंगे यांची कन्या वृषाली व मच्छिंद्र माशेरे तसेच ऋतुजा पाचंगे व तुषार शेळके हे दोन शुभविवाह नुकताच पार पडले. आंबे, जांभूळ, चाफा व शोभिवंत झाडे या वेळी उपस्थितांना भेट देण्यात येऊन वृक्ष संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले.