बहुजननामा ऑनलाइन टीम – कॅन्सर झाला की सारं काही संपलं असेच चित्र अजूनही आहे. पण त्यापासून दूर राहण्यासाठी असे काही पदार्थ आपल्याकडे आहेत. त्या पदार्थांचे सेवन केल्यास कॅन्सरपासून दूर राहता येऊ शकेल. दरवर्षी 4 फेब्रुवारीला ‘जागतिक कर्करोग दिवस’ (World Cancer Day) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू हाच की लोकांमध्ये कॅन्सरच्या आजाराबाबत जागरूकत निर्माण व्हावी. खाणे-पिण्याचा कोणताही पदार्थ कॅन्सरपासून पूर्ण वाचवू शकत नाही. मात्र, काही पदार्थात कॅन्सरविरोधात लढणारे तत्व म्हणून काम करतात. त्याचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.
कॅन्सरचा धोका कमी होण्यास कोणते पदार्थ फायदेशीर आहेत तर जाणून घेऊया…
– विविध रंगांच्या फळे-भाज्या : कॅन्सरपासून लढण्यासाठी फळे आणि भाज्या खाल्ल्याने त्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. विविध रंगांच्या फळे-भाज्यांमध्ये पोषकतत्व आढळतात. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे लाल, हिरवी आणि नारंगी रंगांच्या भाज्यांचा वापर करावा.
– फोलिक ऍसिडचे पदार्थ खावेत : फोलिक (फोलेट) एक महत्त्वपूर्ण व्हिटॅमिन B आहे. त्याचे सेवन केल्याने कोलोन, रेक्टल आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचता येऊ शकते. आपल्या ब्रेकफास्टपेक्षा जास्त फोलेट असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. फोलेटचे प्रमाण वाढविण्यासाठी संत्र्याचा रस, खरबूज आणि स्ट्रोबेरी खावी. याशिवाय अंडे, बीन्सही खावेत.
– टमाटे : टमाट्यांमध्ये लायकोपीन प्रोस्टेटसह इतर पदार्थ आहेत, त्यामुळे कॅन्सरपासून वाचता येऊ शकेल. याशिवाय टमाट्यातून बनलेल्या प्रोसेस्ड फूडसारख्या ज्युस, सॉस किंवा पेस्टमुळे कॅन्सरपासून लढण्याची क्षमता वाढवते.
– ग्रीन टी : ग्रीन टीला कॅन्सरपासून लढण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. याबाबत केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. ग्रीन टी कोलोन, लिव्हर, ब्रेस्ट आणि प्रोस्टेट सेल्सच्या कॅन्सरपासून वाचवते. हे फुफ्फुसाच्या टिश्यू आणि स्कीनवरही प्रभाव टाकते. ग्रीन टी, ब्लेडर, पोट आणि पॅनक्रिएटिक कॅन्सरचा धोका कमी करते.
– द्राक्षे : द्राक्षे आणि त्याच्या रसात रेसवेराट्रॉल असते. रेसवेराट्रॉलमध्ये मजबूत एंटीऑक्सीडेंट आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. रेसवेराट्रॉल कॅन्सरमुळे कोशिकांचे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.
– पाणी आणि अन्य फ्यूड : पाणी फक्त तहानच भागवत नाही तर ब्लेडर कॅन्सरपासूनही वाचवते. डायटमध्ये फ्यूडची लेव्हल वाढवल्यामुळे लघवीला जास्त होते. त्यामुळे ब्लेडर साफ राहते. कॅन्सरची शक्यता कमी होते.
– राजमा : राजमामध्ये कॅन्सरविरोधी गुण असतात. यामध्ये अनेक गुणकारी फायटोकेमिकल्स असते त्यामुळे फायदा होता. राजमामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्व ट्यूमर वाढण्यापासून थांबवते.
– कोबी : ब्रोकोली, पत्ता कोबी हे सर्व कोबीचे प्रकार होते. या सर्व कोबींमध्ये पोषक तत्व असतात आणि शरीराला कॅन्सरपासून वाचवते.